U19 World Cup : सुपर- 6 मध्ये आज भारताचा झिम्बाब्वेशी सामना! मॅचची वेळ काय, कुठे पाहता येईल? वाचा
U19 World Cup 2026 India vs Zimbabwe Super-6 : १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ (U19 World Cup) मध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकल्यानंतर, भारतीय संघ आता सुपर-६ स्टेजमध्ये प्रवेशासाठी सज्ज झाला आहे. आज, मंगळवारी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये भारत आणि यजमान जिम्बाब्वे यांच्यात मुकाबला रंगणार आहे.

न्यूझीलंडवरील विजयानंतर भारतीय संघ फॉर्मात
भारतीय संघाने आपल्या मागील सामन्यात न्यूझीलंडचा ७ गडी राखून धुव्वा उडवला होता. आर.एस. अंबरीश (४ बळी) आणि हेनिल पटेल (३ बळी) यांच्या धारदार गोलंदाजीमुळे किवींचा संघ अवघ्या १३५ धावांत गारद झाला होता. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.
कर्णधार म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीची जोडी
भारतीय क्रिकेटची नवी 'सनसनी' मानला जाणारा वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त लयीत आहे. मागील सामन्यात त्याने ४० धावांची आक्रमक खेळी केली होती. दुसरीकडे, कर्णधार आयुष म्हात्रे याने ५३ धावा फटकावून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी जिम्बाब्वेला मोठ्या फरकाने हरवून आपला लय कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
कुठे पाहता येईल सामना?
टीव्ही प्रेक्षपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network)
लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ-हॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाईट.
भारताचा संघ
आयुष म्हात्रे (कप्तान), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, डी. दीपेश, मोहम्मद एनान, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंह, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन ए. पटेल, हरवंश सिंह, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी.
झिम्बाब्वेचा संघ
सिम्बाराशे मुदजगेरे (कप्तान), नथानिएल ह्लाबंगना, कुपक्वाशे मुरादजी, ब्लिग्नॉट, ध्रुव पटेल, लीरॉय चिवाउला, ब्रैंडन सेंज़ेरे, माइकल ब्लग्नॉट, तातेंदा चिमुगोरो, पनाशे मजई, तातेंदा चिमुगोरो, पनाशे मजई, शेल्टे ब्रैंडन नदिवेनी, वेबस्टर मधिधि, बेनी ज़ुजे.












Click it and Unblock the Notifications