Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 पुर्वी गुजरात टायटन्सला मिळणार नवीन मालक ! भागीदारी खरेदी करण्याचा दिग्गज कंपनी करतेय प्लॅन

IPL 2025, Gujarat Titans: आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने खूप कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच सीझनमध्ये चमकदार कामगिरी करत आयपीएल 2022 चे विजेतेपद जिंकले होते. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन मोठा विजय मिळवला होता.

गुजरात टायटन्स पहिल्यांदाच चॅम्पियन टीम बनली

गुजरात टायटन्सचा आयपीएल प्रवास आतापर्यंतचा खास राहिला आहे. आयपीएल 2022 च्या सीझनमध्ये 10 संघांपैकी या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच वर्षी गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले.

Gujarat Titans

फाईल फोटो सौजन्य- पीटीआय

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने उत्कृष्ट रणनीती आणि चमकदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर स्पर्धेत अनेक सामने जिंकण्यात यश मिळवलं.

गुजरात टायटन्सबद्दल मोठी बातमी

आता आयपीएल 2025 च्या आधी गुजरात टायटन्सबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अहमदाबादस्थित भारतीय समूह टोरेंट ग्रुप आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील 67 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार टोरेंट ग्रुप मूळ मालक CVC कॅपिटल पार्टनर्स (आयर्लिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड) कडून 2/3 हिस्सा खरेदी करेल आणि नवीन मालकी आयपीएल 2025 पासून सुरू होऊ शकते.

आता हा करार कागदपत्रांच्या आधारावर आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या मंजुरीच्या अधीन आहे. जर रिपोर्टवर विश्वास ठेवला तर टोरेंट ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटल्स पार्टनर्समधील करार लवकरच अंतिम होऊ शकतो. अहमदाबाद येथील टोरेंट ग्रुप ही 41000 कोटी रुपयांची कंपनी आहे.

आयपीएल 2025 साठी गुजरात टायटन्स संघ

शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), रशीद खान, कागिसो रबाडा, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, करीम जनत, शेरफेन रदरफोर्ड, गेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्र, अनुज रावत (विकेटकीपर), मानव सुथार, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान. गुरनूर ब्रार, आर साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, कुलवंत खेजरोलिया.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+