Champions Trophy बाबत मोठी अपडेट आली समोर; संघ कोणते? सामने कधी? वाचा सगळी माहिती
Champions Trophy 2025- चॅम्पियन ट्राँफी २०२५ बाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. या टुर्नामेंटमध्ये भारत व पाकीस्तान समोरासमोर येणार आहे. आता या स्पर्धेत भारत खेळेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या स्पर्धेचे वेळापत्रकही आता लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघाने पाकीस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर बराच वाद झाला. अखेर भारताच्या लढती या पाकीस्तानबाहेर करण्यासाठी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड माँडेल तयार केले. त्यामुळे लवकरच या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

यूएईमध्ये होणार भारताचे सामने
भारताने या स्पर्धेत सहभागी होण्यास यापूर्वी नकार दिला होता. भारताला पाकिस्तानमध्ये सामने खेळायचे नव्हते. त्यामुळे बराच वेळ खल झाला. अखेर पाकिस्तानने भारताला पाकिस्तानमध्ये न बोलावता हे सामने बाहेर घेण्यास होकार दिला. म्हणजेच त्यांनी या स्पर्धेचे हायब्रिड माँडेल तयार केले. त्यानंतर भारताने या स्पर्धेत खेळण्यास होकार दिला. टीम इंडियाचे सर्व सामने आता यूएईमध्ये खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेचा उपांत्य आणि अंतिम सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.
स्टार स्पोर्टवर दिसणार सामने
हे सर्व सामने स्टार स्पोर्टवर दाखविले जाणार आहे. आयसीसी किंवा बीसीसीआयने या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील प्रेक्षकांना याबाबत उत्सुकता लागली आहे. मात्र भारतातील प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्टकडे आहेत. त्यांनी या स्पर्धेची जाहिरातही सुरु केली आहे. या जाहिरातीत विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि इतर देशांतील खेळाडूही दिसतात. ही स्पर्धा लवकरच होणार असून, भारतही या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे या जाहिरातीत दाखविण्यात आले आहे.
आठ संघ होणार सहभागी
ही स्पर्धा २००९ पासून खेळवली जाते. तेव्हापासून या स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आले आहेत. चार-चार संघांना ग्रुप ए व ग्रुप बी मध्ये वाटून त्यांच्यातील टाँप टू संघांना उपांत्य फेरीत खेळविले जाते. २०२५ ची स्पर्धेत काही बदल होईल का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र ही स्पर्धा आठ संघातच होईल, अशी शक्यता आहे. आयसीसी यात काही बदल करेल, अशी शक्यता कमी आहे. पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, अफगानिस्तान आणि बांग्लादेश या संघात ही स्पर्धा होणार आहे.
कधी सुरु होणार स्पर्धा?
याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, १९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत ही स्पर्धा होईल, असे समजते. या स्पर्धेचे सामने रावळपिंडी, कराची, लाहोर स्टेडिअमवर होणार आहेत. हायब्रिड माँडेलमध्ये भारताचे सामने हे दुबईत खेळविले जाणार आहेत.












Click it and Unblock the Notifications