Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतीय संघाचा श्रीलंका दौरा, 'या' दिवशी होणार पहिला सामना

टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली संघ सोमवारी कोलंबोला येथे पोहोचला.

team india sri lanka tour

भारत 27 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत तीन टी-20 सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 संघाचे नेतृत्व करेल, तर रोहित शर्मा वनडे संघाचे नेतृत्व करेल...

वर्ल्ड कपनंतरचा भारताचा दुसरा दौरा

टी-20 वर्ल्ड कपनंतरचा टीम इंडियाचा दुसरा दौरा आहे. यापूर्वी भारताने झिम्बाब्वेचा दौरा केला होता. राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

संघासह त्याचा हा पहिलाच परदेश दौरा असून, विजयाने सुरुवात करण्याचे लक्ष्य आहे. संघातील प्रमुख बदलांमध्ये हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवची टी-20 कर्णधारपदी आणि शुभमन गिलची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एकूण सामने किती?

भारतीय संघ आपल्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या T20 मालिकेने करेल. पहिला सामना 27 जुलैला, दुसरा सामना 28 जुलैला आणि अंतिम सामना 30 जुलैला होणार आहे. सर्व T20 सामने पल्लेकेले येथे संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील.

पहिल्या एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरूवात होईल त्यानंतर 4 आणि 7 ऑगस्टला सामने होतील. हे सामने कोलंबोमध्ये दररोज दुपारी अडीच वाजता सुरू होतील.

ही मालिका गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली असणार आहे. नवीन नेतृत्वाचा श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गंभीरच्या कोचिंगमध्ये रोमांचक सामने आणि नवीन रणनीती पाहण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी आगामी सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक-
27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)
28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)
30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)
2 ऑगस्ट - पहिली वनडे (कोलंबो)
4 ऑगस्ट - दुसरी वनडे (कोलंबो)
7 ऑगस्ट - तिसरी एकदिवसीय (कोलंबो)

श्रीलंकेविरुद्ध भारताचा टी-20 संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

भारताचा वनडे संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर , अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+