प्रो कबड्डी लीगचा प्रारंभ; पहिल्याच सामन्यात बंगळुरू बुल्सचा पराभव, पवन सेहरावत बनला सुपर 10
प्रो कबड्डी लीगची प्रतीक्षा आता संपली आहे. या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. हैदराबादमध्ये लीगच्या सामन्यांना पहिला सामना तेलुगू टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात पार पडला. प्रो कबड्डी लीग सीझन 11 च्या पहिल्या सामन्यात तेलुगू टायटन्सने शानदार प्रदर्शन करत विजय मिळवला आहे.
या सामन्यादरम्यान पवन सेहरावतने सर्वाधिक 13 गुण मिळवून सुपर-10 मिळवण्यात यश मिळवले. त्याचवेळी बंगळुरू बुल्सचा कर्णधार प्रदीप नरवालला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्याला सामन्यात केवळ 3 गुण मिळवता आले. बुल्सकडून सुरिंदरने सर्वाधिक 5 गुण मिळवले. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला. दुसरा सामना दबंग दिल्ली आणि यू मुंबा यांच्यात रंगला आहे.

प्रो कब्बडी लीगचे उद्घाटन झाले. याप्रसंगी विविध सेलिब्रिटिंनी हजेरी लावली. त्यानंतर सामन्याला सुरूवात झाली. दुसरीकडे, तेलुगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्स यांच्यातील हेड टू हेड आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामन्यांचा विचार केला तर तेलुगू टायटन्स कुठेही दिसत नाहीत. दोन्ही संघांमध्ये खूप फरक आहे. टायटन्स आणि बुल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने झाले आहेत. यामध्ये बुल्सने 16 वेळा बाजी मारली आहे. तेलुगू टायटन्सने केवळ 3 सामने जिंकलेले आहेत.
हे ही वाचा : PKL 2024: प्रो कबड्डी लीगचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहू शकता, सर्व माहिती एका क्लिकरवर

तेलुगु टायटन्स आणि बंगळुरू बुल्स यांच्यातील
तेलुगू टायटन्स : मनजीत (रेडर), सागर (उजवे कव्हर), अजित पवार (लेफ्ट कव्हर), पवन सेहरावत (कर्णधार आणि रेडर), विजय मलिक (अष्टपैलू), कृष्णा धुल्ल (उजवा कोपरा) आणि अंकित (डावा कोपरा).
बेंगळुरू बुल्स : परदीप नरवाल (कर्णधार आणि रेडर), सुरिंदर सिंग (डिफेंडर), प्रतीक (डिफेंडर), जय भगवान (रेडर), अजिंक्य पवार (रेडर), सौरभ नंदल (उजवा कोपरा), नितीन रावल (डावा कोपरा).












Click it and Unblock the Notifications