Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PKL 2024: प्रो कबड्डी लीगचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहू शकता, सर्व माहिती एका क्लिकरवर

PKL 2024 Live Streaming: प्रो कबड्डी लीग 2024 चा 11 वा सीझन 18 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरू झाला आहे. हैदराबादमधील प्रसिद्ध जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात बंगळुरू बुल्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील रोमांचक लढतीने या स्पर्धेची सुरुवात होईल. टूर्नामेंटचे सर्व सामने केव्हा आणि कुठे थेट पाहू शकतात ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

प्रो कबड्डी लीगच्या 11व्या सीझनची सुरुवात दुहेरी हेडरने होत आहे. ज्यामध्ये तेलगू टायटन्स आणि बंगळुरू बुल्सचा पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. त्यानंतर दबंग दिल्लीचा सामना यू मुम्बाशी होईल तर पुणेरी पलटण 19 तारखेला आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

Pro Kabaddi League 2024

प्रो कबड्डी सीझनचे सर्व सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार?

प्रो कबड्डी लीगची स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर दरम्यान हैदराबाद, नोएडा आणि पुणे या शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. PKL सीझन 11 चे सर्व 132 लीग स्टेज सामने दुहेरी हेडर म्हणून आयोजित केले जातील. पहिला सामना आज रात्री 8 PM वाजता सुरू होईल, त्यानंतर दुसरा सामना रात्री 9 वाजता होईल.

प्रो कबड्डी सीझनचे 11 चे सर्व सामने कुठे पाहू शकता?

प्रो कबड्डी सीझन 11 चे सामने तुम्ही सहा भाषांमध्ये उपलब्ध असतील. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलुगु, तामिळ आणि कन्नड भाषेचा समावेश आहे. देशभरातील चाहत्यांना त्यांच्या आवडत्या भाषेत या खेळाचा आनंद घेता येणार आहे. सामन्यांची हिंदी कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्सवर उपलब्ध असेल. तुम्ही Disney+ Hotstar वर PKL सीझन 11 चे लाइव्ह स्ट्रीमिंग सुध्दया पाहू शकता.

प्रो कबड्डी सीझनचे सर्व 12 संघ कोणते ?

पुणेरी पलटण, तेलुगू टायटन्स, बंगळुरू बुल्स, बंगाल वॉरियर्स, यू मुंबा, हरियाणा स्टीलर्स, तमिळ थलायवास, दबंग दिल्ली, गुजरात जायंट्स, जयपूर पिंक पँथर्स, पटना पायरेट्स आणि यूपी योद्धा लीग टप्प्यात एकमेकांशी दोनवेळा भिडणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+