विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस, तर दक्षिण आफ्रिकेलाही मिळाली तब्बल एवढी रक्कम
आयसीसी पुरुषांची T20 विश्वचषक स्पर्धा 2024 संपन्न झाली आहे. 2 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी-20 विश्वचषक खेळला गेला. बार्बाडोस येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने 7 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा 29 जूनचा दिवस होता. कोट्यावधी क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाने शनिवारी अनेक आनंदाचे क्षण दिले. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत ट्विट्वेंटी विश्वचषक आपल्या नावावर केला.
T20 विश्वचषक जिंकणारा भारतीय संघाला छप्परफाड रक्कम मिळाली आहे. तर दुसरीकडे उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघावरही पैशांचा पाऊस पडलाय.

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने या मेगा इव्हेंटसाठी आधीच बक्षीस रक्कम जाहीर केली होती. T20 विश्वचषक 2024 साठी एकूण $11.25 दशलक्ष (अंदाजे रु. 93.51 कोटी) बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली होती.
T20 विश्वचषक 2024 जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंदाजे 20.36 कोटी रुपये ($2.45 दशलक्ष) मिळाले.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघाला एवढी रक्कम मिळाली आहे. तर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला, म्हणजे उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला अंदाजे 10.64 कोटी रुपये ($1.28 दशलक्ष) मिळाले.
तर उपांत्य फेरीत पोहोचलेले इतर दोन संघ, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना अंदाजे 6.54 कोटी रुपये ($787,500) प्रत्येकी दिले गेले.
यावेळी T20 विश्वचषकात 20 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाला आयसीसीने काही रक्कम दिली होती. सुपर-8 (दुसरी फेरी) च्या पुढे न जाणाऱ्या संघांना प्रत्येकी $382,500 (अंदाजे 3.17 कोटी रुपये) मिळाले.
तर नवव्या ते 12व्या स्थानी असलेल्या संघांना प्रत्येकी 247,500 डॉलर (सुमारे 2.05 कोटी रुपये) मिळाले. 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येकी $225,000 (अंदाजे रु. 1.87 कोटी) मिळाले. याशिवाय, सामना जिंकल्यावर (उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी वगळता) संघांना अतिरिक्त $31,154 (अंदाजे रु. 25.89 लाख) मिळाले.
T-20 विश्वचषक 2024 ची बक्षीस रक्कम
• विजेता (भारत): सुमारे 20.36 कोटी रुपये
• उपविजेता (दक्षिण आफ्रिका): रु 10.64 कोटी
• सेमीफायनल: 6.54 कोटी रुपये
• दुसऱ्या फेरीत बाहेर पडल्यास: 3.17 कोटी रुपये
• 9व्या ते 12व्या क्रमांकाचे संघ: 2.05 कोटी रुपये
• 13व्या ते 20व्या स्थानापर्यंतचे संघ: 1.87 कोटी
• फेरी 1 आणि फेरी 2 मधील विजय: रु 25.89 लाख












Click it and Unblock the Notifications