Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gongdi Trisha : तृषा गोंगाडी U19 विश्वचषकात शतक करणारी पहिली फलंदाज, जाणून घ्या तिच्याबद्दल सर्वकाही

T20 U19 World Cup Gongdi Trisha : तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील त्रिशा गोंगडी हिने लहान वयातच महिला क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने आज 2 फेब्रुवारी 2025 रोजी मलेशियातील क्वालांलापूर येथे झालेल्या सामन्यात मोठा विक्रम केला. महिला अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारताततर्फे सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू ती ठरली आहे.

तृषाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार प्रदर्शन केले. गोलंदाजीत तिने 3 खेळाडूंना बाद केले आणि दक्षिण आफ्रिकेला 82 धावांच्या आतच रोखले तर प्रथम सलामीला फलंदाजीला येत तिने 44 धावांची खेळी करत विक्रम केला आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला. या उमद्या आणि देशाला अभिमान असलेल्या महिला खेळाडूबद्दल जाणून घेऊया.

T20 U19 World Cup Gongdi Trisha

तृषा गोंगडी कोण आहे? जीवनचरित्र

तृषा गोंगडी ही एक भारतीय महिला क्रिकेटपटू आहे, जिने अलीकडेच अंडर 19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावून इतिहास रचला आहे. 19 वर्षीय त्रिशा गोंगडीच्या या कामगिरीनंतर ती 19 वर्षाखालील T20 विश्वचषकात शतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज ठरली आहे. 28 जानेवारी 2025 रोजी स्कॉटलंड विरुद्धच्या सुपर-6 सामन्यात त्याने 59 चेंडूत 110 धावा केल्या, ज्यात 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश
होता.

तृषा गोंगडीची स्टोरी प्रेरणादायी

तृषा गोंगडीची स्टोरी युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान आहे, हे दाखवून देते की समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन कोणतेही ध्येय गाठता येते. तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील तृषा गोंगडी हिने लहान वयातच महिला क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

तृषा गोंगडीचा जन्म 15 डिसेंबर 2005 रोजी निजामाबाद, तेलंगणा येथे झाला. निजामाबाद येथील स्थानिक शाळेत तिने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. तिला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. कुटुंबाच्या पाठिंब्याने तृषाने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

तृषाची कारकीर्द

तृषाने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. तिची प्रतिभा आणि मेहनत यामुळे तृषा गोंगडीला लवकरच राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली.

  • तिने विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
  • तृषा गोंगाडी ही उजव्या हाताची फलंदाज आहे, जी तिच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीसाठी ओळखली जाते.
  • तृषा मैदानाभोवती फटके खेळण्यास सक्षम आहे आणि त्याचे तंत्र अत्यंत मजबूत आहे.

त्रिशा गोंगडीची कामगिरी

  • स्कॉटलंडविरुद्धच्या सुपर-6 सामन्यात 59 चेंडूत नाबाद 110 धावा करत तृषा गोंगडी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात शतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
  • याआधी, तृषा 2002 च्या अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होती.
  • त्रिशा गोंगडीच्या या यशामुळे ती भारतीय महिला क्रिकेटच्या उगवत्या ताऱ्यापैकी एक बनली आहे आणि तिच्या कामगिरीमुळे भविष्यात भारतीय महिला क्रिकेट संघ आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+