Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत-इंग्लंड सामन्याच्या तिकीट विक्रीवेळी चेंगराचेंगरी; पोलिसांकडून पाण्याचा मारा, पाहा- Video

Stampede during ticket sales for India England match : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात उद्यापासून (दि.6 फेब्रुवारी) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरला खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर दुसरा सामना हा कटमधील बाराबाती मैदानावर पार पडणार आहे.

त्यातच सामन्याचा प्रत्यक्षदर्शी होण्यासाठी क्रिकेटप्रेमींकडून तिकीट खरेदी करण्यासाठी गर्दी केली जात आहे. दुसऱ्याच्या सामन्याच्या तिकीट विक्रीला बुधवारी स्टेडियमवर सुरूवात होणार होती. परंतु, या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. दुसऱ्या सामन्यासाठी स्टेडियमवर सकाळी 9 वाजता बुधवारी (5 फेब्रुवारी) तिकीट विक्रीला सुरुवात होणार होती. मात्र, या तिकीट विक्रीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. स्थानिकांकडून योग्य व्यवस्थापन न केल्याचे आरोप ओडिशा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर केला जात आहे.

Ind vs Eng

मंगळवारी रात्रीपासूनच लोक स्टेडियमवर आले होते

बुधवारी स्टेडियममध्ये तिकीट विक्रीवेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीही झाली, यादरम्यान काही चाहते बेशुद्ध पडल्याचेही दिसून आले. गर्दीच्या व्यवस्थापनेच्या अभावामुळे संतप्त स्थानिक लोकांनी अपुऱ्या सुविधा आणि नियोजनाला जबाबदार धरले आहे पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचे आरोप चाहत्यांनी केले आहे. तसेच बाहेर पडण्याचे योग्य मार्ग न ठेवल्याचाही अधिक गोंधळ वाढल्याचेही चाहत्यांनी म्हटले आहे.

हजारो चाहते जमल्याने पोलिस प्रशासनाची तारांबळ

हजारो चाहते तिकीट खरेदीच्या आशेने मंगळवारच्या रात्रीपासूनच स्टेडियमजवळ जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे बुधवारी सकाळीच मोठी रांग लागल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे गर्दीही वाढली आणि गोंधळ झाला.

या गोंधळानंतर लगेचच स्थानिक पोलिसांनी सर्व गोष्टी त्यांच्या नियंत्रणाखाली घेतल्या. तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना एक दोन वेळा पाण्याचा मारा करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम झाले. यानंतर सध्या आयोजक तिकीटविक्रीची प्रक्रिया कोणत्याही गोंधळाशिवाय व्हावी, यावर काम करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+