Shubman Gill : शुभमन गिलचं जबरदस्त द्विशतक; इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, हा नवा विक्रमही रचला!
Shubman Gill double century News in Marathi : भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे सोपवण्याचा बीसीसीआयच्या निवड समितीचा निर्णय अतिशय योग्य ठरला आहे.
शुभमन गिलनं बर्मिंघम कसोटीमध्ये द्वीशतक झळकावून एक नवा विक्रम केला आहे. तसेच त्याची निवड त्याने योग्य असल्याचे देखील त्याच्या खेळातून सिद्ध केले.
सुरुवातीला यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत भागीदारी करत भारतीय संघाला समाधानकारक धावसंख्येजवळ शुभमन गिलनं पोहोचण्याचे काम केले. तर द्विशतकानंतर देखील त्याने त्याची खेळी जबरदस्त सुरू ठेवलेली असून इंग्लंडच्या गोलंदाजांना धो-धो धुणं सुरूच ठेवलं आहे.

भारताचा कॅप्टन म्हणून शुभमनच्या सर्वाधिक धावा!
त्यासोबतच शुभमन गिलनं इंग्लंडमध्ये भारताचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा केल्या आहेत. मोहम्मद अजहरुद्दीन यानं 1990 मध्ये 179 धावांची खेळी केली होती. शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे. शुभमन गिलनं या डावात 21 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
शुभमनने सावरला भारताचा डाव!
भारतानं काल 211 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 203 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला.
भारतानं 470 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल 87 आणि रवींद्र जडेजाच्या 89 धावांचा समावेश आहे. शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीमुंळं इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. भारतानं एजबेस्टनमध्ये यापूर्वी सर्वाधिक 416 धावा केल्या होत्या.
IND vs ENG 2nd Test Score : भारतचा स्कोर 500च्या पुढे
भारतीय संघाने 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टीम इंडियाने एजबॅस्टन मैदानावरचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आधीच मोडला आहे. 128 षटकांत भारताने 6 गडी गमावून 508 धावा केल्या आहेत. कर्णधार गिलने 230 धावा केल्या आहेत, वॉशिंग्टन सुंदर 23 धावा केल्यानंतर त्याच्यासोबत खेळत आहे.












Click it and Unblock the Notifications