Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अवघ्या 25व्या वर्षी शुभमन गिल बनला टीम इंडियाचा कर्णधार; पण हे विक्रम तो मोडू शकला नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी शुभमन गिलची भारतीय क्रिकेट संघाचा नवा कसोटी कर्णधार म्हणून घोषणा केली. शुभमन गिल रेड-बॉल क्रिकेट फॉरमॅटमध्ये रोहित शर्माची जागा घेईल. रोहित आणि विराट कोहली यांच्या धक्कादायक निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची ही सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

25 वर्षीय शुभमन गिल 20 जून रोजी लीड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातून भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करेल. शुभमन गिल हा भारतीय कसोटी क्रिकेटमधील पाचवा सर्वात तरुण कर्णधार असेल. तो मन्सूर अली खान पतौडी, सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि रवी शास्त्री यांच्यानंतर टीम इंडियाचे नेतृत्व करणारा पाचवा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.

shubman gill became captain

पतौडीच्या नावावर हा विक्रम नोंदवला

भारताचा सर्वात तरुण कसोटी कर्णधार होण्याचा विक्रम मन्सूर अली खान पतौडी यांच्या नावावर आहे. जेव्हा मन्सूर अली खान पतौडी यांनी कसोटी संघाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांचे वय फक्त 21 वर्षे 77 दिवस होते. 23 मार्च 1962 रोजी ब्रिजटाऊन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी खेळली. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. त्याने 23 वर्षे 169 दिवसांच्या वयात कसोटी संघाची सूत्रे हाती घेतली. त्याने 10 ऑक्टोबर 1996 रोजी नवी दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कर्णधारपदाची सुरुवात केली.

कसोटी सामन्यांमध्ये भारताचा सर्वात तरुण कर्णधार

  • मन्सूर अली खान पतौडी - २१ वर्षे ७७ दिवस VS वेस्ट इंडिज, ब्रिजटाऊन - २३ मार्च १९६२
  • सचिन तेंडुलकर - २३ वर्षे १६९ दिवस VS ऑस्ट्रेलिया, दिल्ली - १० ऑक्टोबर १९९६
  • कपिल देव - २४ वर्षे ४८ दिवस VS वेस्ट इंडिज, किंग्स्टन - २३ फेब्रुवारी १९८३
  • रवी शास्त्री - २५ वर्षे २२९ दिवस VS वेस्ट इंडिज, चेन्नई - ११ जानेवारी १९८८
  • शुभमन गिल - २५ वर्षे २८५ दिवस VS इंग्लंड, लीड्स - २० जून २०२५
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+