Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'लेडी धोनी'ची WPL मध्ये एन्ट्री! कधीकाळी विना कपड्यांच्या फोटोशूटमुळे उडाली होती खळबळ...

Sarah Taylor Joins WPL 2026 : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) सुरू होण्यापूर्वी गुजरात जायंट्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंडची दिग्गज यष्टिरक्षक सारा टेलर, जिला तिच्या चपळाईमुळे 'महिला क्रिकेटमधील एम.एस. धोनी' म्हटले जाते, तिची गुजरात जायंट्सच्या फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Sarah Taylor Joins WPL 2026

गुजरात जायंट्सने खेळला 'मास्टरस्ट्रोक'

WPL 2026 च्या हंगामासाठी गुजरात जायंट्सने आपली कोचिंग टीम अधिक मजबूत केली आहे. मुख्य प्रशिक्षक मायकेल क्लिंगर आणि गोलंदाजी प्रशिक्षक प्रवीण तांबे यांच्या ताफ्यात आता सारा टेलरचा समावेश झाला आहे. सारा ही जगातील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षकांपैकी एक मानली जाते. तिचे मार्गदर्शन गुजरातच्या खेळाडूंची फिल्डिंग आणि यष्टिरक्षण सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

धोनी आणि संगकाराशी तुलना

सारा टेलरने इंग्लंडसाठी २२६ सामन्यांमध्ये ६,५०० हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, तिची खरी ओळख स्टंप्सच्या मागे असलेल्या तिच्या 'लाईटनिंग फास्ट' हालचालींमुळे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करणाऱ्यांच्या यादीत ती एम.एस. धोनी आणि कुमार संगकारा यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होती. तिच्या या कामगिरीमुळेच २०२५ मध्ये तिचा 'आयसीसी हॉल ऑफ फॅम'मध्ये समावेश करण्यात आला.

विना कपड्यांच्या फोटोशूटची का झाली होती चर्चा?

सारा टेलर केवळ तिच्या खेळासाठीच नाही, तर एका धाडसी फोटोशूटमुळेही चर्चेत आली होती. २०१९ मध्ये महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी तिने विना कपड्यांचे एक फोटोशूट केले होते. "प्रत्येक मुलीला आपल्या शरीराचा अभिमान वाटला पाहिजे," असा संदेश तिने या माध्यमातून दिला होता. सुरुवातीला या फोटोंवर टीका झाली असली, तरी साराने अत्यंत आत्मविश्वासाने या मोहिमेचे समर्थन केले होते.

१० जानेवारीपासून मोहिमेला सुरुवात

गुजरात जायंट्स आपला पहिला सामना १० जानेवारी रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर 'यूपी वॉरियर्स' विरुद्ध खेळणार आहे. अ‍ॅशले गार्डनरच्या नेतृत्वाखालील या संघात सारा टेलरच्या आगमनाने क्षेत्ररक्षणाची बाजू अधिक भक्कम होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+