Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अफगाणिस्तानच्या टीमसाठी सचिनचं खास ट्विट, कॅप्टन राशिद म्हणतो धन्यवाद सचिन सर

अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने 25 जून रोजी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर 8 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने या विजयासह बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर ढकलत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

sachin tendulkar

अफगाणिस्ताननं बांगलादेश विरुद्ध 115 धावांचा शानदार बचाव केला. अफगाणिस्तानच्या या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेट विश्वातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही अफगाणिस्तान टीमचं भरभरुन कौतुक केलं आहे. सचिनने त्यांच्या एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या या प्रवासाचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सचिनच्या या पोस्टला अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान याने उत्तर देत आभार मानले आहेत.

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने ट्टिट करत अफगाणिस्तान टीमचं भरभरुन कौतुक केलं

"अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांवर मात करत उपांत्य फेरीपर्यंतचा तुमचा प्रवास अविश्वसनीय ठरला आहे. आजचा विजय हा तुमच्या मेहनतीचा आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. त्यामुळे तुमच्या प्रगतीचा अभिमान वाटतो, असंच चालू राहू दे!", असं सचिनने 25 जून रोजी पोस्ट केलं होतं. राशिदने ती पोस्ट रिट्विट करत सचिनचे आभार मानले आहेत.

राशिदने सचिनची पोस्ट शेअर करत आभार व्यक्त केले आहेत. "Thank you Sachin Sir", असं म्हणत राशिदने आभार मानलेत. राशिदला या पोस्टवर अनेक क्रिकेट चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलंय. तसेच पुढील सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

अफगाणिस्तानच्या विजयावर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग म्हणाला, काय शानदार विजय होता. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांचा पराभव करून सेमीफायलमध्ये पोहोचणे. अशा पद्धतीने प्रगती करत रहा. अभिनंदन. भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने देखील अफगाणिस्तानला या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान आता अफगाणिस्तानचा सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध लढत होणार आहे. हा सामना गुरुवारी 27 जून रोजी होणार आहे. सामन्याला सकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+