टीम इंडीया ठरली विजेती; रोहित- विराटचा स्टंप घेऊन दांडिया, तर हर्षित- जडेजाचा भांगडा, पहा व्हिडीओ
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला.भारताचे तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानावर स्टंप घेऊन दांडिया खेळताना दिसले. याशिवाय अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांचा भांगडाही पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Virat And Rohit doing Dandiyaaaa 🥺🇮🇳😭😭😭#INDvsNZ pic.twitter.com/0wUhEOxXDa
— Satyam (@iamsatypandey) March 9, 2025
जडेजाचा विजयी चौकार
रवींद्र जडेजाने विजयी चौकार मारताच भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आनंदाला सीमा राहिली नाही. वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली स्टंपसह दांडिया खेळताना दिसले आणि अनुभवी खेळाडूंनी विजयाचा पुरेपूर आनंद घेतला. दांडिया खेळल्यानंतर, कोहली आणि रोहितने एकमेकांना मिठी मारली आणि कॅमेऱ्यासमोर पोजही दिली.
One Team
— BCCI (@BCCI) March 9, 2025
One Dream
One Emotion!
🇮🇳🇮🇳🇮🇳#TeamIndia pic.twitter.com/MbqZi9VGoG












Click it and Unblock the Notifications