निवृत्ती घेतली म्हणून काय झालंय! रोहित-विराटवर BCCIचे विशेष प्रेम! त्यांना मिळणार हे मोठं गिफ्ट?
rohit sharma virat kohli Latest News : बीसीसीआयची केंद्रीय करार यादी अद्याप जाहीर झालेली नाही. क्रिकेटप्रेमी त्या यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचे कारण असे की, त्या यादीत आपल्या आवडत्या खेळाडूला कोणते स्थान मिळणारी याची उत्सुकता याची त्यांना लागून राहिलेली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ए प्लस श्रेणीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. पण हे होणार नाही. एका वृत्तानुसार, बीसीसीआय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्याची तयारी करत आहे. त्याचे कारण नेमकं काय याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

निवृत्ती घेतली म्हणून काय झालंय, अजूनही जलवा कायम
ANIच्या वृत्तानुसार विचार जर केला तर, गेल्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही बीसीसीआय अनुभवी भारतीय स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ए प्लस श्रेणीत ठेवणार आहे. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनाही ए प्लस श्रेणीत समाविष्ट केले जाऊ शकते. गेल्या वर्षी रवींद्र जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
श्रेयस अय्यरला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
गेल्या वर्षी, श्रेयस अय्यरला 2023-2024 च्या केंद्रीय करार यादीतून वगळण्यात आले. पण यावेळी तो परत येईल अशी अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर मुंबईकडून रणजी करंडक सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर या स्टार फलंदाजाचा यादीत समावेश करण्यात आला नाही. तथापि, यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला आणि उत्तम कामगिरी देखील केली.
इशान किशनच्या नावावर अद्याप चर्चा नाही
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयात श्रेयसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिथे तो पाच डावांमध्ये 243 धावा करून संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. इशान किशनच्या पुनरागमनाची शक्यता कमी आहे. जरी त्याने अलिकडेच आयपीएलच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले. तरी, निवड समिती सध्या इशानच्या नावावर चर्चा करत नाही. बीसीसीआय ए प्लसमधील खेळाडूंना दरवर्षी 7 कोटी रुपये देते. ते अ श्रेणीला 5 कोटी रुपये, ब श्रेणीला 3 कोटी रुपये आणि क श्रेणीला 1 कोटी रुपये देते.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेट जगतातील असे तारे आहेत, ज्यामुळे भारतीय चाहत्यांना कायमच आनंद देत असतात. त्यामुळे बीसीसीआय त्यांच्याबाबत नक्कीच चांगले गिफ्ट देणार आहेत.












Click it and Unblock the Notifications