Rohit sharm: टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा रोहीत शर्मा एवढ्या संपत्तीचा आहे मालक, किती आहे पगार?
Rohit sharma retirement : टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्मा याने टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला असून त्याने निवृत्ती घेतली आहे. याआधी त्याने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली पण तो वनडे आणि आयपीएल सामने खेळतो.गेल्या अनेक दिवसांपासून रोहीत शर्मा निवृत्तीच्या विचारात होता, तशा बातम्याही आल्या पण आयपीएलदरम्यान एका पत्रकार परिषदेत त्याने आपण निवृत्ती घेणार नाही या अफवा आहेत असे स्पष्ट केले होते. हे तो सर्वप्रकारच्या क्रिकेटबद्दल बोलत होता पण आता त्याने अचानक तडकाफडकी कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली आहे.

रोहीत शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याच्या खेळाची आणि करिअरमध्ये मिळवलेल्या पैशांची चर्चा होत आहे. रोहीत जरी टेस्ट क्रिकेट खेळणार नसला तरीही तो आयपीएल खेळत आहे आणि वनडे क्रिकेट सामनेही खेळणार आहे. आयपीएलमध्ये त्याची बॅट चमकत आहे.
आयपीएलमध्ये तळपतेय रोहीत शर्माची बॅट (Rohit sharma net worth)
आयपीएलमध्ये गेल्या दोन सामन्यांपासून रोहीत शर्माचा दबदबा पुन्हा पाहायला मिळत आहे. त्याचा हरवलेला फार्म परत आला असून आयपीएलच्या दोन सामन्यात सलग दोन अर्धशतकं झळकावली होती. त्याच्या खेळीमुळे मुंबई गुणतालिकेत अगदी वरच्या क्रमांकावर आली आहे. रोहीत शर्माची किती संपत्ती आहे आणि तो किती कमावतो हे आज आपण जाणून घेऊया.
रोहित शर्माची एकूण संपत्ती किती आहे? (Rohit sharma net worth)
- रोहितची एकूण मालमत्ता सुमारे ₹214 कोटी आहे.
- आयपीएल पगार (2025): ₹16.30 कोटी
- एकूण आयपीएल कमाई: ₹174.3 कोटी
- बीसीसीआय करार (ग्रेड ए+): ₹7 कोटी
- वार्षिक सामना शुल्क: कसोटी ₹15 लाख, एकदिवसीय ₹6 लाख, टी20 ₹3 लाख
रोहीतला घरभाडेच मिळते 3 लाख
मुंबईतील दोन फ्लॅटमधून दरमहा ₹ 3 लाख रुपये भाडे रोहीतला मिळते.
मुंबईतील वरळी येथे एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत सुमारे ₹30 कोटी आहे.
रोहीत शर्माचे कार कलेक्शन
- रोहीत शर्माकडे लॅम्बोर्गिनी उरुस - ₹4.18 कोटी
- मर्सिडीज एस-क्लास 350डी - ₹1.5 कोटी
- मर्सिडीज जीएलएस 400डी - ₹1.5 कोटी
- बीएमडब्ल्यू एम-5 - ₹1.79 कोटी
- रेंज रोव्हर एचएसई एलडब्ल्यूबी - ₹2.80 कोटी
रोहीत शर्मा बीसीआयकडून कमावतो वर्षाला 7 कोटी रुपये
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माला केंद्रीय कराराच्या यादीत A+ ग्रेडमध्ये स्थान दिले आहे. या श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. ब्रँड एंडोर्समेंट: अॅडिडास, सीएएटी, हब्लॉट, ओकले इत्यादींकडून तो कोट्यवधी रुपये कमावतो.












Click it and Unblock the Notifications