Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Rohit sharma : हिटमॅन रोहीत शर्माची संपत्ती किती, IPL मधून किती कमावले? कोणत्या गाड्यांचा आहे शौकिन

Rohit sharma net worth salary : भारताचा धुरंधर फलंदाज आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्मा सध्या आयपीएलचे क्रिकेट सामने खेळत आहे. सुरुवातीच्या पाच ते सात सामन्यात सुमार कामगिरी त्याच्याकडून सुरु होती पण नंतरच्या सलग दोन सामन्यात त्याने फलंदाजी करुन आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली.

आयपीएलमध्ये गेल्या दोन सामन्यांपासून रोहीत शर्माचा दबदबा पुन्हा पाहायला मिळत आहे. फार्म हरवून बसलेला हा मात्तबर खेळाडू आता पुन्हा आपल्या लयीत आला असून त्याने दोन सामन्यात सलग दोन अर्धशतकं झळकावली. त्याच्या या खेळीमुळे मुंबई गुणतालिकेतही वरच्या क्रमांकावर हळूहळू येत आहे. त्याने खेळलेल्या दोन्ही अफलातून खेळीने मुंबईने सलग दोन विजय मिळवले आहेत.

Rohit sharma net worth salary

या खेळाडूवर जेवढी टीका होते तेवढीच त्याची लोकप्रियताही आहे. क्रिडा रसिक त्याच्यावर भरभरुन प्रेम करतात आणि आपल्या खेळाच्या जोरावर त्याने अफाट संपत्तीही कमावली आहे. आज आपण रोहीत शर्माची संपत्ती किती आहे हे जाणून घेऊया.

Take a Poll

रोहीतला बीसीआय देते वर्षाला 7 कोटी रुपये

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहित शर्माला केंद्रीय कराराच्या यादीत A+ ग्रेडमध्ये स्थान दिले आहे. या श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात.

कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात.

IPL मधून किती कमावतो हिटमॅन रोहित?

रोहितने त्याच्या आतापर्यंतच्या IPL प्रवासात खूप कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये सुमारे 200 कोटी रुपये पगाराची कमाई केली आहे. या लीगमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते.

रोहित शर्माकडे किती आहेत कार?

तुम्हाला सांगायचे झाल्यास, रोहित शर्माचे मुंबईतील वरळी येथे 4 BHK फ्लॅट आहे, ज्याची किंमत करोडो रुपये आहे. हा फ्लॅट जगातील 50 सर्वोत्तम उंच इमारतींपैकी एक आहे. येथून समुद्राचे 270 डिग्रीचे दृश्य दिसते.

रोहित शर्माकडे लंबोर्गिनी कार आणन त्या व्यतिरिक्त BMW M5 आणि मर्सिडीज GLS 350d आहे. BMW ची किंमत 1.55 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते तर मर्सिडीजची किंमत सुमारे 1.05 कोटी रुपये आहे. याशिवाय रोहित शर्माच्या कलेक्शनमध्ये BMW X3 आणि Toyota Fortuner सारख्या कार देखील आहेत.

हेही वाचा : ipl 2025 rohit sharma: हिटमॅन नव्हे आता रोहित शर्माला मिळाले 'हे' नवे टोपणनाव! कुणी दिले? घ्या जाणून

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+