रोहित शर्माच्या घड्याळाची किंमत एवढी मोठी की मुंबईत घेता येईल आलीशान बंगला, फोटो व्हायरल!
Rohit Sharma latest News : भारताचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा सध्या मैदानावर नसला तरी, ओव्हल कसोटी सामन्यादरम्यान त्याची एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा झाली आहे. रोहित अचानक स्टेडियमवर पोहोचला आणि यशस्वी जयस्वालच्या शतकाचा साक्षीदार झाला. त्यावेळी रोहितने घातलेल्या एका महागड्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
घड्याळाची किंमत, मुंबईतील घरापेक्षा जास्त
ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने जीन्स आणि जॅकेट घातले होते. त्याच्या हातात ऑडेमर्स पिगेट रॉयल ओक जंबो थिन स्मोक्ड बरगंडी टायटॅनियम हे आलिशान घड्याळ होते. या घड्याळाची किंमत ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घड्याळाची किंमत तब्बल २.५ कोटी रुपये आहे, म्हणजेच नेमकी २ कोटी ४६ लाख रुपये इतकी आहे.

या घड्याळाच्या किमतीत मुंबईसारख्या शहरात एका पॉश भागात आलिशान घर विकत घेता येईल, अशा कमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित नेहमीच आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखला जातो, पण त्याच्या या घड्याळाने चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे.
रोहित आणि कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!
रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यापूर्वीच कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता. त्याच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलला कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहितशिवाय विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीने भारतीय कसोटी संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, पण गिलच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आपली जादू दाखवली आहे.
The happiness on Rohit Sharma's face when Jaiswal complete his hundred at ovel.🥹❤️ pic.twitter.com/xn3xTrT8Bf
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 2, 2025
ओव्हल कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या दिवशी भारतीय संघ इंग्लंडला पराभूत करून मालिका २-२ अशी बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील या एन्ट्रीमुळे, त्याच्या घड्याळाची चर्चा क्रिकेट सामन्याइतकीच झाली आहे.












Click it and Unblock the Notifications