RCB vs PBKS बंगळुरू की पंजाब कोण जिंकणार 'आयपीएल' ट्राॅफी? सट्टा बाजारातून आली मोठी अपडेट जाणून घ्या
RCB vs PBKS phalodi satta bazar predicts : आयपीएलचा झगमगाट आता फक्त आजच्या दिवसच शिल्लक आहे, आज आयपीएलचा अंतीम सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात आज, मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.
राजस्थानच्या नामचीन फलोदी सट्टा बाजारने या सामन्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. बुकींच्या मते, यावेळी आरसीबी पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकू शकते, त्यामुळे आज नेमके कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पहिल्यांदाच नवीन संघ चॅम्पियन बनणार (RCB vs PBKS)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 18 व्या आवृत्तीचा अंतिम सामना क्रिकेटप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. कारण यामध्ये दोन संघ आमने-सामने आहेत, ज्यांनी आतापर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत, आजचा सामना ऐतिहासिक ठरणार आहे, कारण आयपीएलचा अंतीम सामना आज नवा विजेता देणार आहे.
फलोदी सट्टा बाजारात कुणाची हवा? (RCB vs PBKS)
आयपीएल स्पर्धेबाबत फलोदी सट्टा बाजार नेहमीच चर्चेत असतो. आता या सट्टा बाजारातील बुकींनी आरसीबी जिंकण्याची शक्यता आहे असे म्हटल्याचे वनइंडिया हिंदीच्या वृत्तात नमूद आहे.
फलोदी सट्टा बाजारची भविष्यवाणी किती खरी? (RCB vs PBKS)
फलोदी सत्ता बाजार हे निवडणुका आणि खेळांबद्दलच्या धाडसी आणि कधीकधी अचूक भाकितांसाठी ओळखले जातात. त्यानुसारच त्यांचे गणित चालते. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 ला निवडणुकीचे फलोदी सट्टा बाजारचे भाकित चुक ठरले होते. यावेळीही भाकिते चुकीची ठरली तर पंजाब किंग्ज इतिहास रचू शकतात आणि पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनू शकतात.
असे आहेत संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य संघ : विराट कोहली, फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन/रोमारियो शेफर्ड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवूड, सुयश शर्मा
PBKS संभाव्य संघ : पंजाबचे संभाव्य प्लेइंग-11 पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ओमरझाई, काइल जेम्सन, हरदीप चर्मर, ब्रह्मेंद्र सिंह, अरशेंद्र सिंह वैशाख.
हेही वाचा : India Squad :इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमनकडे कमान, जाणून घ्या सर्व खेळाडूंची यादी
हेही वाचा : ठरलं! या दिवशी फायनल, पंजाब किंग्ज आरसीबी सामन्याची तारीख, वेळ जाणून घ्या, कुठे LIVE बघाल सामना?












Click it and Unblock the Notifications