Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंजाब किंग्ज आरसीबी सामन्याची वेळ, टाॅस जाणून घ्या, कुठे LIVE बघावा सामना? सर्व डिटेल्स एकाच क्लिकवर

IPL 2025 RCB vs PBKS Final Date Time : आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) ने मुंबई इंडियन्स (MI) चा 5 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1 जून 2025 रोजी रात्री झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात आधी पावसाने व्यत्यय आणला होता, मात्र त्यानंतर हा सामना मध्यरात्री पुर्ण झाला. आता सर्वांच्या नजरा आज 3 जून 2025 रोजी होणाऱ्या अंतीम सामन्याकडे वळल्या आहेत.

IPL 2025 RCB vs PBKS Final

आयपीएलचा हंगाम सुरु झाल्यापासून दहा संघात मोठे टशन रंगले होते. कोण प्लेऑफमध्ये पोहचणार, कोण घरी जाणार आणि कोण फायनलमध्ये पोहचणार अशा चर्चा आणि शक्यता आता संपल्या आहेत, त्यानंतर आता एकच शक्यता उरली ती म्हणजे फायनल मॅच कोण जिंकणार अर्थात आयपीएल ट्राॅफी कुणाला मिळणार..

Take a Poll

दोन्ही संघ ट्राॅफीचे तितकेच दावेदार

कालच्या सामन्यात विजय मिळवत श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्ज संघाने आयपीएलच्या अंतीम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले. मुंबईचा पराभव करुन या संघाने ही किमया साधली आहे. आधीच फायनलमध्ये पोहचलेल्या राॅयल चॅलेंजर बंगळुरू संघासोबत पंजाब किंग्जचा सामना रंगणार आहे.

तसे पाहिले तर राॅयल चॅलेंजर बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्हीही या स्पर्धेत जोरदार कामगिरी करणारे संघ आहेत. या संघांनी चेन्नई सुपर किंग्ज , मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद तसेच दिल्ली कॅपिटलसारख्या संघाला धुळ चारली आणि अंतीम फेरी गाठली आहे.

आरसीबी आणि पंजाब किंग्जची भक्कम फलंदाजी आणि गोलंदाजी हे दोन्ही संघाचे बलस्थान आहे, त्यामुळे आता दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहे, असे असले तरीही एकच संघ विजयी ठरणार आहे, त्यामुळे आयपीएलचा विजेता कोण हे जाणून घ्यायचे असेल तर सामन्यानंतरच कळणार आहे. तूर्त दोन्ही संघातील मेगाफायनलचा सामना कधी कोठे आणि कुठे पाहायचा हे सर्व आपण जाणून घेऊया.

आयपीएल फायनल मॅच कधी आणि कुठे होणार? (IPL 2025 RCB VS PBKS FINAL) सर्व प्रश्नांची उत्तरे

आयपीएल फायनल मॅच कधी आणि कोणत्या संघात होणार आहे? (RCB VS PBKS FINAL)

आयपीएलचा अंतीम सामना 3 जून 2025 रोजी होणार आहे. हा सामना पंजाब किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर बंगळुरू या संघात होईल.

आयपीएल फायनल मॅच कोठे होणार आहे? (RCB VS PBKS FINAL)

आयपीएलचा अंतीम सामना 3 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे?

आयपीएल फायनल मॅचची नाणेफेक किती वाजता होईल? (RCB VS PBKS FINAL)

आयपीएलच्या अंतीम सामन्याची नाणेफेक 3 जून 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

आयपीएल फायनल मॅचला सुरुवात किती वाजता होणार आहे? (RCB VS PBKS FINAL)

आयपीएलच्या अंतीम सामन्याला 3 जून 2025 रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार
आहे.

आयपीएल फायनल मॅच कुठे बघता येईल, लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे दिसेल.? (RCB VS PBKS FINAL)

आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (स्टार स्पोर्ट्स 1 एचडी/एसडी) वर इंग्रजी समालोचनासह थेट प्रक्षेपित केला जाईल तर लाईव्ह स्ट्रीमिंग jio-hotstar APP आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+