हिट मॅन 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये परतला! रणजी ट्रॉफीत ही रोहित शर्मा फ्लॉप ठरला
Ranji Trophy 2024-2025 : रणजी ट्रॉफी 2024-25 सीझनला आजपासून सुरुवात झाली आहे. आज गुरुवारी मुंबईच्या बीकेसी मैदानावर जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बॅटशी संघर्ष सुरूच आहे. लाल चेंडूवर खराब फॉर्मशी झुंजत असलेला रोहित शर्माने आपला फॉर्म शोधण्याच्या उद्देशाने स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी आला होता. पण तो इथेही फ्लॉफ ठरला. रोहीतने 19 चेंडूत अवघ्या 3 धावावर बाद झाला.

फोटो सौजन्य- पीटीआय
रोहित शर्माने शेवटचा रणजी सामना 2015 मध्ये खेळला होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून फलंदाजीत खराब कामगिरी केल्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना फॉर्ममध्ये ठेवण्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळणे अनिवार्य केल्यानंतर रोहितने मुंबईकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माने यशस्वी जयस्वालसोबत डावाची सावध सुरुवात केली आणि नवीन चेंडूवर मध्यभागी स्थिरावण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माचे 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलं आहे. जम्मू आणि काश्मीरविरुद्ध भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा एकेरी धावसंख्या गाठली तर दुसरीकडे यशस्वी जयस्वाललाही काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने 8 चेंडूत फक्त 4 धावा काढून जयस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतला. जयस्वालनंतर रोहित शर्माही तीन धावा काढून परतला.
💔💔#RanjiTrophypic.twitter.com/3Ane9axB7X
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) January 23, 2025
मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर संघ
जम्मू आणि काश्मीर: शुभम खजुरिया, विवरांत शर्मा, अब्दुल समद, पारस डोगरा (कर्णधार), कन्हैया वाधवान (यष्टीरक्षक), आकिब नबी दार, यावर हसन, युद्धवीर सिंग चरक, आबिद मुश्ताक, उमर नजीर मीर, वंश शर्मा.
मुंबई: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तामोर (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुश कोटियन, मोहित अवस्थी, कर्ष कोठारी.












Click it and Unblock the Notifications