Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

T20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडने पुन्हा चाहत्यांची मने जिंकली, ही मोठी ऑफर नाकारली

मुंबई : ICC T20 विश्वचषक (T20 WC 2024), टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला आहे, पण द्रविडने शेवटच्या क्षणी असे काही केले, ज्यामुळे त्यांची कारकीर्द आणखी आठवणीत राहणार आहे.

Rahul Dravid

द्रविडने आपल्या प्रामाणिक चारित्र्याचा आदर्श घालून दिला आहे, राहूल द्रविड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांपैकी 5 कोटी रुपये भारतीय संघासाठी दान केले आहेत. T20 विश्वचषक जिंकण्यासाठी बक्षिसाची अर्धी रक्कम सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राहुल द्रविडने ही मोठी ऑफर नाकारली रोहित शर्माच्या संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजेतेपद पटकावल्यानंतर, बीसीसीआयने संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला रोख पुरस्कार म्हणून एकूण 125 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी 5 कोटी रुपये, तर संघाच्या इतर प्रशिक्षकांना 2.5 कोटी रुपये देण्यात येणार होते.

द्रविडने बक्षीसाची रक्कम कमी करण्यास सांगितले

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, द्रविडने बोर्डाला त्याचे रोख बक्षीस 2.5 कोटी रुपये करण्यास सांगितले कारण त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांपेक्षा जास्त पैसे घ्यायचे नव्हते.

सपोर्ट स्टाफच्या सन्मानार्थ उचलले मोठे पाऊल:

रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'राहुल, त्याच्या उर्वरित सपोर्ट स्टाफप्रमाणे (गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर) यांच्याप्रमाणे राहूल द्रविड यांना ही 2.5 कोटी हवे आहेत.

याआधीही द्रविडने असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही

यापूर्वी, 2018 मध्ये भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी अशीच भूमिका स्वीकारली होती. त्यावेळी द्रविडला 50 लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफच्या इतर सदस्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये मिळणार होते. सूत्रानुसार खेळाडूंना प्रत्येकी 30 लाख रुपये मिळणार होते. द्रविडने असे विभाजन नाकारले आणि बीसीसीआयला समान पुरस्कार देण्यास भाग पाडले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+