Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कंगाली में निलामी का शौक! PSL कडून IPLची 'नक्कल'; हार्दिक पंड्याच्या घड्याळापेक्षाही कमी बजेट!

PSL Auction 2026 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या 'पाकिस्तान सुपर लीग' (PSL) मध्ये क्रांतीकारी बदल करण्याची घोषणा केली आहे. २०२६ पासून पीएसएलमध्ये पारंपारिक 'ड्राफ्ट' पद्धत बंद करून आयपीएलप्रमाणे 'लिलाव' पद्धत राबवली जाणार आहे. मात्र, हा बदल जाहीर होताच सोशल मीडियावर पीएसएलच्या बजेटवरून मोठी चर्चा आणि तुलना सुरू झाली आहे.

PSL Auction 2026

'ड्राफ्ट'ला रामराम, आता होणार खेळाडूंचा लिलाव

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी अधिकृतपणे जाहीर केले की, २०२६ मधील पीएसएलच्या ११ व्या हंगामापासून खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने केली जाईल. आतापर्यंत खेळाडूंचे मानधन त्यांच्या श्रेणीनुसार (प्लॅटिनम, डायमंड इ.) निश्चित असायचे. मात्र, आता स्टार खेळाडूंवर बोली लावली जाईल, ज्यामुळे त्यांना अधिक कमाई करण्याची संधी मिळेल, असा दावा पीसीबीने केला आहे.

रिटेन्शन नियमांत मोठी कपात

लिलाव प्रक्रियेमुळे संघांची रचना पूर्णपणे बदलणार आहे. नवीन नियमांनुसार,

  • मर्यादित रिटेन्शन : प्रत्येक फ्रँचायझीला आता केवळ ४ खेळाडू कायम ठेवता येतील (पूर्वी ही संख्या ८ होती).
  • अटी : प्रत्येक श्रेणीतून फक्त एकच खेळाडू राखता येईल.
  • नवे बदल : मार्गदर्शक (Mentor) आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर यांसारख्या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 'राईट टू मॅच' (RTM) कार्डचा पर्यायही काढून टाकण्यात आला आहे.

हार्दिक पंड्याचं घड्याळ vs संपूर्ण PSL संघ

पीएसएलने बजेट वाढवल्याचा दावा केला असला तरी, आयपीएलमधील खेळाडूंच्या मानधनाशी तुलना केल्यास ही रक्कम अतिशय तोकडी वाटते. पीएसएलच्या एका संपूर्ण संघाचे बजेट (₹१३.३ कोटी) हे हार्दिक पंड्याच्या मनगटावर असलेल्या घड्याळाच्या किमतीपेक्षाही (₹२० कोटी) कमी आहे. आयपीएलमध्ये मिचेल स्टार्क किंवा पॅट कमिन्ससारख्या खेळाडूंना मिळणारी रक्कम ही पीएसएलच्या दोन-तीन संघांच्या एकत्रित बजेटइतकी आहे.

पीएसएल २०२६ चे स्वरूप!

  • सुरुवात : २६ मार्च २०२६ पासून ११ वा हंगाम सुरू होईल.
  • परदेशी खेळाडू : प्रत्येक संघाला एका परदेशी खेळाडूला थेट करारबद्ध (Direct Signing) करण्याची मुभा असेल, बशर्ते तो पीएसएल १० मध्ये खेळलेला नसावा.
  • नवे ठिकाण : स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यासाठी आता फैसलाबाद येथेही सामने आयोजित केले जाणार आहेत.

'नक्कल' तरीही 'तुलना' अशक्य?

पीसीबीचा हा निर्णय आयपीएलच्या यशाची कॉपी करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. लिलाव पद्धतीमुळे स्पर्धेत चुरस वाढेल हे खरे असले, तरी आर्थिक बाबतीत पीएसएल अजूनही आयपीएलच्या कोसो दूर आहे. जिथे आयपीएलच्या एका लिलावात शेकडो कोटींची उलाढाल होते, तिथे पीएसएलचे संपूर्ण बजेट एखाद्या स्टार खेळाडूच्या वैयक्तिक वस्तूंच्या किमतीइतकेही नसल्याने क्रीडा विश्वातून उपरोधिक टीका होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+