Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PKL : प्रो कबड्डी लीगमध्ये आजचा सामना कोणासोबत, घ्या जाणून

Pro kabaddi league 2024 : प्रो कबड्डी लीगमध्ये आज एकूण दोन सामने होणार आहेत. पहिला सामना पटना पायरेट्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही या लीगमधील यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघाने दोन किंवा अधिक वेळा विजेतेपद मिळवले आहे. दुसरा सामना दबंग दिल्ली आणि तमिळ थलायवास यांच्यात होणार आहे.

जयपूर पिंक पँथर्सचा या मोसमात चौथा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. जयपूरने आतापर्यंत सहा सामने खेळले असून तीन सामने जिंकले आहेत. पटनाचीही परिस्थिती अशीच आहे, पण दोन्ही संघांमध्ये गुणतालिकेत खूप अंतर आहे.जयपूर संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या तर पटना दहाव्या स्थानावर आहे. पटना संघ गुणांच्या बाबतीत पिछाडीवर आहे. या सामन्यात पिंक पँथर्स विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करेल पण जयपूर पिंक पँथर्सही मजबूत आहे.

Dabang Delhi

दबंग दिल्लीने त्यांच्या शेवटच्या सामन्यात बंगालचा पराभव केला होता, या विजयाने त्यांचे मनोबल नक्कीच उंचावले असेल पण यावेळी समोर तामिळ थलायवास आहे. थलायवासने या मोसमात आतापर्यंत प्रभावी खेळ केला आहे. तामिळ थलायवास 7 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

दबंग दिल्ली केसी सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दिल्लीचा हा नववा सामना असेल. दिल्लीने आठपैकी तीन सामने जिंकले आहेत. थलायवासविरुद्ध दबंग दिल्लीचा सामना कसा होणार हे पाहणे महत्वाचे आहे. स्पर्धा चुरशीची असेल पण थलायवास संघची परिस्थिती मजबूत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+