'पृथ्वी शॉ' याने घेतला मोठा निर्णय; सातत्याने वेळ जातोय वाया, नाही संधी, नेमकं काय करणार?
Prithvi Shaw Latest Marathi News : एक काळ असा होता जेव्हा पृथ्वी शॉ ला भविष्यातील स्टार क्रिकेटर मानले जात असे, अर्थात त्याचा खेळ देखील तसाच होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकले.
परंतु, त्यानंतर हळूहळू त्याच्या शिस्तीच्या आणि इतर गोष्टींच्या बातम्या येत राहिल्या आणि तो संघाबाहेरही गेला. नंतर त्याला आयपीएल मध्येही संधी मिळाली नाही.
शुभमन गिल कप्तान बनला, पण पृथ्वीला संधी मिळेना..!
अंडर 19 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा शुभमन गिल तर आता भारतीय संघाचा कर्णधार बनला आणि पृथ्वी शॉला देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळण्याची संधी मिळत नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ ला तिथेही चांगले स्थान मिळत नसल्याचे समोर आले. अखेर त्याने मोठा निर्णय घेतला आहे.

पृथ्वीने काय घेतला निर्णय?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉ याने मुंबई क्रिकेट असोसिएशनशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो कदाचित कधीही या संघाकडून खेळताना दिसणार नाही. इतर कोणत्याही संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतलेल्या पृथ्वी शॉ ने ना हरकत प्रमाणपत्राची मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे मागणी केल्याचे समोर आले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील वृत्ताकडून मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉने ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. तथापि, तो कोणत्या संघाकडून खेळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई क्रिकेटच्या निवडकर्त्यांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. पण त्याबाबत देखील अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
पृथ्वी शॉ ची होती एक अट?
गेल्या वर्षी त्याला सांगण्यात आले होते की, जोपर्यंत तो त्याची तंदुरुस्ती सुधारत नाही आणि वजन कमी करत नाही. तोपर्यंत त्याला संघात स्थान मिळणार नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. नंतर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावादरम्यान, कोणीही पृथ्वी शॉ याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.
अर्जून तेंडुलकरनेही घेतला मोठा निर्णय!
दुसरी बाब म्हणजे, पृथ्वी शॉ प्रमाणे, अर्जुन तेंडुलकरनेही काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला, जेव्हा त्याला कळले की मुंबई संघात स्थान मिळवणे इतके सोपे नाही, तेव्हा त्याने येथून आपला बाडबिस्तारा भरला अन् थेट गोवा संघाकडून खेळण्यासाठी गेला. अगदी तशीच परिस्थिती पृथ्वी शॉ वर आलेली आहे, त्यामुळे तो देखील असाच निर्णय घेणार आहे.












Click it and Unblock the Notifications