विनेश डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात, पीएम मोदी म्हणाले विरोध दर्शवा, ऑलिम्पिकवर बहिष्कार टाका - खासदार

नवी दिल्ली - भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला सुवर्णपदकाच्या सामन्यातून अपात्र ठरवल्यानंतर ती डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दुसरीकडे लोकसभेत खासदारांनी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

या सर्व पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भारतीय ऑलिम्पिक असोसीएशनच्या अध्यक्षा आणि प्रख्यात माजी धावपटू पी.टी. उषा यांच्याशी दुरध्वनीवरुन विनेश संदर्भात संवाद साधून नेमकी स्थिती जाणून घेतली आहे. जर यासंदर्भात तीव्र विरोध दर्शवा असे पंतप्रधान मोदी यांनी पी. टी. उषा यांना सांगितले आहे.

PM spoke to IOA President PT Usha regarding Vinesh Phogat s disqualification

100 ग्रॅम वजन जास्त असल्यानं अपात्र!

विनेश फोगट फक्त 100 ग्रॅम वजनाची मर्यादा पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले होते, कुस्ती (UWW) नियमानुसार, वजन गटात बसत असल्याचे स्पष्ट करता आले नाही अशा कुस्तीपटूला अपात्र ठरवले जाते आणि सर्वात शेवटी स्थान दिले जाते. याचा अर्थ फोगट आता कोणत्याही पदकाची संधी मिळणार नाही. तिच्या अपात्रतेचा अर्थ म्हणजे ती पदकाविना मायदेशी परतणार आहे.

विनेशला अपात्र ठरवल्याचा भारत निषेध नोंदवणार?

विनेश फोगटला अपात्र ठरवल्याबद्दल भारत निषेध नोंदवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. विनेश फोगट ऑलिम्पिक सुवर्णपदक सामना आज खेळणार नाही हे अपात्रतेमुळे स्पष्ट झालं आहे. विनेशला रेसलिंगच्या मैदानाऐवजी वैद्यकीय उपचार घेताना बघणं हे स्पर्धेदरम्यानच्या तिच्या पूर्वीच्या विजय आणि सामर्थ्याच्या विरुद्ध आहे. विनेशचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास विलक्षण होता. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनून तिने इतिहास रचला होता.

विनेश,चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशसंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, "विनेश तु भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आज धक्का दुखदः आहे. माझी इच्छा आहे की मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांनी व्यक्त करावी. त्याच वेळी, मला माहित आहे की तु प्रचंड चिकाटीचे प्रतीक आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुझा नेहमीच स्वभाव राहिला आहे."

ऑलिम्पिकवर बहिष्कार टाका- खासदारांची मागणी

विनेश फोगट हिच्या अपात्रेसंदर्भात स्पष्टता आल्यानंतर लोकसभेतही यावर खल झाला. खासदारांनी ऑलिम्पिक स्पर्धेवर बहिष्कार घालावा अशी मागणी सरकारकडे आता होत आहे. यासंदर्भात आता भारताची काय पावित्रा असेल हे मात्र लवकरच स्पष्ट होईल.

पीएमकडून विनेशसंदर्भात पीटी उषांकडे चौकशी

पीएम नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिकचे अध्यक्षाष पीटी उषा यांच्याशी आज दुरध्वनीवरुन संवाद साधला. पीटी उषा यांच्याकडून विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्रथम माहिती घेतली. त्यांनी उषा यांना विनेशच्या केसमध्ये मदत करण्यासाठी सर्व पर्याय शोधा असे सांगितले आहे. विनेशला मदत होत नसल्यास तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, असे त्यांनी पीटी उषा यांना आवाहन केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+