PM XI मॅचेससाठी भारतीय संघ आस्ट्रेलियात, कधीपासून खेळले जातात हे सामने, काय आहे इतिहास? वाचा
PM 11 History matches when did start : आस्ट्रेलियात सध्या भारत आणि PM 11 (पंतप्रधान 11- आस्ट्रेलिया) यांच्यात सामना सुरु आहे. पीएम इलेव्हन संघाबाबत अनेक जणांना उत्सुकता आहे. हा कोणता संघ आहे असेही विचारले जाते आज आम्ही याचसंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.
PM XI म्हणजेच पंतप्रधान 11 काय आहे, कधी झाली सुरुवात कशामुळे क्रिकेट सामने खेळायला सुरुवात झाली. कोणकोणते देश आतापर्यंत हे सामने खेळले गेले हे आपण पाहूया.

कुणी सुरु केले सामने?
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान रॉबर्ट मेंझीस हे क्रिकेटचे निस्सीम चाहते होते. त्यांनी 1951 मध्ये या सामन्यांची सुरुवात केली. या सामन्यातून जमा होणारा निधी मृत ऑस्ट्रेलियन सैनिकांच्या आश्रितांसाठी असलेल्या धर्मादाय संस्थेला दान करण्यात आली. त्यासाठी हा सामना महत्वाचा होता.
निवृत्तीनंतर 14 वर्षांनी खेळले सर डाॅन ब्रॅडमन
1962-63 मध्ये, सर डोनाल्ड ब्रॅडमन मेरीलेबोन क्रिकेट क्लबविरुद्ध पंतप्रधान इलेव्हनसाठी खेळण्यासाठी निवृत्तीतून बाहेर पडले हे विशेष. वयाच्या 54 व्या वर्षी ते मैदानावर उतरले. ब्रॅडमन यांची स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची ही शेवटची वेळ होती आणि ब्रायन स्टॅथमने केवळ चार धावांवर त्यांना बोल्ड केले. जेव्हा ब्रॅडमन पॅव्हेलियनमध्ये परतले तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान रॉबर्ट मेंझीस यांना सांगितले की, "हे हजार वर्षांत होणार नाही. असो, तो मैदानावर माझा शेवटचा खेळ होता."
पहिल्यांदा वापरली डकवर्थ लुईस पद्धत
2 डिसेंबर 2005 रोजी कॅनबेरा वादळामुळे सामना लवकर संपवावा लागला, ऑस्ट्रेलिया PM XI ने 31व्या षटकात 4/316 आणि वेस्ट इंडिजचा 3/174 धावा होता. PM XI ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून सहा धावांनी विजय मिळवला. इतिहासात प्रथमच ही पद्धत वापरून निर्णय सामन्याच्या विजय पराजयाची निश्चितीकरण्यात आली.
2014 मध्ये, पंतप्रधान इलेव्हनचा सर्वात मोठा पराभव
2014 मध्ये, पंतप्रधान इलेव्हन संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केवळ 92 धावांवर बाद झाला. पंतप्रधान इलेव्हन संघाला इतिहासातील सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला.
कधी झाला पहिला सामना
27 ऑक्टोबर 1951 पंतप्रधान इलेव्हन संघाचा सामना वेस्ट इंडिजसोबत झाला. हा एकदिवसीय सामना अनिर्णित राहीला. तेव्हा रॉबर्ट मेंझीस हे पंतप्रधान होते तर यंदाच्या मौसमातील सामना आज 1 डिसेंबर 2024 रोजी भारताविरुद्ध होत आहे. अँथनी अल्बानीज सध्या आस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत.
कोणकोणत्या संघानी खेळले सामने
पीएम इलेव्हनसोबत आतापर्यंत भारत, वेस्टइंडिज, दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड,इंग्लड,पाकिस्तान,श्रीलंका आदी संघांनी सामने खेळले यासह इतर स्थानिक संघही हे सामने खेळले आहेत. वनडे सामनेच खेळले जात असतानाच नोव्हेंबर 2022 आणि डिसेंबर 2023 या काळात चार दिवसीय कसोटी सामने खेळले गेले होते.












Click it and Unblock the Notifications