Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाककडून हिसकावले जाऊ शकते चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद; टीम इंडिया नाही खेळणार, नेमकं काय ठरलं!

PCB Champions Trophy Venue Controversy : फेब्रुवारी-2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदापासून पाकिस्तान वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, भारताने पाकिस्तानात जाऊन ही स्पर्धा खेळण्यास नकार थेट नकार दिला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थाने ICC ने याबाबतची अधिकृत माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) दिली आहे. पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी देखील या मुद्द्यावर आता पाकिस्तान सरकाकडे मार्गदर्शन मागितले आहे. भारत पाकिस्तान संबंधामुळे येत्या काळात पीसीबीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद हिसकावले जाण्याची चर्चा सद्या सुरू झालेली आहे.

India vs Pakistan

..तर टीम पाकिस्तीन खेळणार नाही

तणावग्रस्त राजकीय संबंधांमुळे 2008 पासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळलेला नाही. दर दुसरीकडे पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनने पीसीबीच्या एका सूत्राचा हवाला देत सांगितले की, जर पाकिस्तानकडून यजमानपद हिरावले गेले तर ते या स्पर्धेत खेळण्यास नकार देऊ शकते.

गेल्या वर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. भारताने या स्पर्धेतील आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले. पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली होती.

भारताने पाकमध्ये जाण्यास दिला नकार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास थेट नकार दिलेला आहे. आयसीसीने अधिकृत मेलद्वारे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) ही माहिती दिलेली आहे.

पाकने हायब्रीड मॉडेल नाकारले
पीसीबीने आधीच स्पष्ट केले आहे की ते चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करणार नाहीत. हायब्रीड मॉडेल म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जावेत आणि उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळल्या जाव्यात.

आशिया कपमध्ये हायब्रीड मॉडेलचा स्वीकार

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक खेळवण्यात आला होता. पाकिस्तानला यजमानपदाची संधी दिली होती, पण भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर एसीसीने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत आणि बाकीचे सामने पाकिस्तानमध्ये झाले. पाकिस्तानचा सामना भारत विरुद्ध श्रीलंकेत झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+