Paris Paralympics 2024 : भारताची पॅरालिम्पिक मोहीम फत्ते, खेळाडूंनी मिळवले 7 सुवर्णांसह 29 पदक
Paris Paralympics 2024 : रविवारी पॅरिस पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताने आपली मोहीम संपवली आहे. पूजा ओझा या स्पर्धेत भाग घेणारी शेवटची ऍथलीट होती. ओझा कॅनो स्प्रिंटमधील महिला KL1 200 मीटर अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. त्यामुळे आज भारताची या स्पर्धेतील मोहीम बाहेर पडली. दुसरीकडे, आतापर्यंच्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील भारताची यंदाची कामगिरी चांगली होती. यावेळी भारताने विक्रमी 29 पदके जिंकली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत 18 व्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारताने पदकतालिकेत स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, बेल्जियम आणि अर्जेंटिना या देशांना मागे टाकले. तर पाकिस्तान फक्त एका कांस्य पदकासह संयुक्त तळाशी 79 व्या स्थानावर आहे.
नवदीप सिंगने शनिवारी पुरुषांच्या भालाफेक F41 वर्गीकरणात सुवर्ण जिंकून भारतासाठी अंतिम पदक जिंकले. सुरुवातीला नवदीपने 47.32 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले आणि चीनच्या विश्वविक्रमधारक सन पेंग्झियांगला मागे टाकले.

तथापि, इराणच्या सदेघ बाईत सयाहला आक्षेपार्ह ध्वज प्रदर्शित केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले आणि यानंतर नवदीपचे रौप्य पदक सुवर्णपदकात श्रेणीसुधारित करण्यात आले. पेंग्झियांगने 44.72 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले.
चार सुवर्णांसह 17 पदकांसह ट्रॅक-अँड-फील्ड भारतासाठी विशेषतः फायदेशीर ठरले. सिमरनने तिचा मार्गदर्शक अभय सिंगसह महिलांच्या 200 मीटर (T12) स्पर्धेत 24.75 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.
आतापर्यंतच्या इतिहास यंदा सर्वाधिक पदकं
भारताने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकून चांगलीच चमक दाखवली आणि बजेट हाही मोठा मुद्दा बनला आहे. भारतीय खेळाडूंनी माफक बजेटमध्ये आपले काम चोख बजावले आहे. ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचे बजेट 520 कोटी रुपये होते. तयारीसाठी एवढा पैसा खर्च केल्यानंतर 6 पदके मिळाली आणि त्यापैकी एकही सुवर्णपदक मिळाले नाही.
खेळाडूंचे बजेट वाढवण्याची होतेय मागणी
पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंचे बजेट 20 कोटी रुपये होते. इतक्या कमी प्रमाणात तयारी केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी 29 पदके जिंकली आणि त्यात 7 सुवर्णपदकांचा समावेश आहे. अशा स्थितीत आता या खेळांचे बजेट वाढवण्याची वेळ आली आहे कारण 20 कोटी रुपये उंटाच्या तोंडात जिरे आल्यासारखे आहेत.












Click it and Unblock the Notifications