सामना सुरु असताना विठ्ठलाचा धावा.. आईच्या डोळ्यात अश्रू! स्वप्निलचे वडिल म्हणाले - मुलानं नाव कमावलं
मुंबई - देशासाठी कास्यपदक जिंकणाऱ्या स्वप्निल कुसळे याच्या गावात आनंदोत्सव होत असून, गावात तिरंगा घेत फेरीही काढण्यात आली. यानंतर स्वप्निलच्या आई आणि वडिलांची मोठी प्रतिक्रीया समोर आली असून सामना सुरु असताना मी विठ्ठलाचा धावा करीत होते, माझ्या डोळ्यात अश्रू होते असे त्यांनी संगितले.
काय म्हणाली स्वप्निलची आई?
स्वप्निल कुसळे याची आई जेव्हा माध्यमासमोर बोलती झाली तेव्हा त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. "सामना सुरु असताना मी विठ्ठलाचा धावा करत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते..ते अश्रू आनंदाचे होते. मला माझ्या मुलावर विश्वास होता." असे त्या म्हणाल्या.

त्यानं स्वप्न पुर्ण केलं..- स्वप्निलचे वडिल
स्वप्निलचे वडिल म्हणाले, "खरोखरच त्याचा अभिमान वाटतो. मी माध्यमांचं कौतूक करतो. तो जिंकायचा होता तो जिंकणार की, नाही माहित नव्हतं माध्यमांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्याचा प्रत्यक्षात मी खेळ पाहिला नाही, मोबाईलमध्ये त्याचा खेळ बघतो. त्याची चिकाटी आम्ही पाहायचो. एक एक अंशावरुन त्याचे स्थान मागेपुढे व्हायचे पण तो अखेर जिंकला.. त्याचं स्वप्न पुर्ण होतं आणि ते त्यानं पुर्ण करुन दाखवलं."

कोल्हापुरात त्याचं जंगी स्वागत करु
स्वप्निलचे वडिल म्हणाले. "कोल्हापुरात त्याचं जंगी स्वागत करु. देशाचा तिरंगा ध्वज नेहमीसाठी उंचच तो ठेवेल अशी आशा आहे. सहाव्या स्थानावर तो होता तेव्हा धाकधूक होती पण नंतर तो तिसऱ्या स्थानावर आला आणि जिंकला समाधान वाटतं."

जेवणं थांबवलं पण सराव नाही
स्वप्निलचे वडिल म्हणाले, "स्वनिलनं जे पदक आज जिंकलं ते पदक त्यानं देशवासियांना समर्पित केलं आहे. त्यानं साऱ्या गावाचं, देशाचं नाव उंचावल. आठवीनंतर तो नेमबाजीचा सराव करत आहे. जेवण त्यानं थांबवलं पण त्यानं सराव कधी थांबवला नाही."

स्वप्निलची मोठी तपस्या, प्रशिक्षकाचा मोलाचा वाटा
स्वप्निलचे वडिल म्हणाले, "कुसाळे म्हणजे नेमबाजी असं नाव घेतलं जातं. कुसाळे परिवाराचं नाव याआधीही एका नेमबाजानं नाव कमावलं होतं. जर इच्छाशक्ती असेल तर खडकाचंही सोनं होऊ शकतं माणूस प्रयत्नानंतर मोठा होतो. स्वप्नीलची मोठी तपस्या आहे, त्याच्या प्रशिक्षकही महत्वाच्या आहेत. दीपा देशपांडे यांनी त्याच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, त्यांचे या पदकात श्रेय आहे. मी शिक्षक आहे आमचं योगदान त्याच्या यशात आहे."

गावात काढली फेरी..वाजवले फटाके
स्वप्निल कुसळेनं ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवल्यानंतर त्याच्या गावात शालेय विद्यार्थ्यांनी स्वप्निल दादा जिंकला अशी घोषणाबाजी केली यासह तिरंगा ध्वज उंचावत एक फेरीही काढली. गावात फटाकेही फोडण्यात आले.












Click it and Unblock the Notifications