... तेव्हा हृदयात धडधड! ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवणाऱ्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया काय? वाचा
कोल्हापूरचा मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसळे याने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला असून भारतासाठी कास्यपदक मिळवून दिलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्निल कुसळेने 590 गुणांसह 50 मीटर थ्री पोजिशनच्या पुरुष गटात अंतीम फेरीत धडक मारली होती. अंतीम फेरीत त्याने पदक मिळवलं आहे.

स्वप्नीलच्या या यशानंतर त्याने पहिली प्रतिक्रीया दिली असून खेळताना आपण फक्त लक्ष्यावरच नेम साधत होतो. केवळ त्यावरच फोकस होता असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाला स्वप्निल?
स्वप्निल कुसळेनं भारताला मेडल मिळवून दिल्यानंतर तो खूश होता तो म्हणाला, "मी देशासाठी मेडल आणलं. मला खूप चांगलं वाटत आहे. मला कास्य मिळालं त्यामुळं मी थोडा नाराज होतो. पण सो आता मेडल मिळालं हे महत्वाचं वाटतं."
हृदयात धडधड होतं होतं..
स्वप्निल कुसळे म्हणाला की, " जेव्हा खेळ सुरु होता तेव्हा माझी हृदयगती वाढली होती. पण माझे काही कि वर्डवर होते, त्यामुळे मी लक्ष केंद्रीत केलेलेच होते. मला जे मिळवायचं होतं त्यावरच माझं फोकस होतं."
स्कोर पाहिला नाही खेळावरच लक्ष्य होतं
स्वप्निल कुसळे म्हणाला की, " मी स्पर्धेतल्या फेरीत कितव्या स्थानावर होतो हे मला माहित नव्हतं, माझ्यासमोर चांगला खेळ करायचा हेच उद्दीष्ट होतं. मी माझा चांगला परफार्मन्स केला. एलिमिनेशन राऊंडमध्ये काय सुरु आहे. हे मी पाहिलंही नाही, स्कोरही मी पाहीलेला नव्हता. एवढ्या वर्षांपासून खेळावर फोकस केलं होतं तेच इथं केलं."
स्वप्निलच्या धडाकेबाज कामगिरीनंतर कुटुंबीयांचा जल्लोष
पॅरिस इथं सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळे यानं अंतिम फेरीत टक्कर देत तिसऱ्या क्रमांकावर आपलं स्थान मिळवलं. ऑलम्पिकमध्ये कोल्हापूरच्या या पट्ट्याने बाजी मारत कास्यपदकाशी कमाई केली आहे.
कास्यपदकाची कमाई केल्याचे समजताच कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी स्वप्निलच्या कांबळवाडी येथील घरात जल्लोष करत स्वप्निलच्या कामाचं कौतुक केलं आहे.यावेळी स्वप्नाच्या घरात स्वप्निलच्या विजयाच्या घोषणा देत टाळ्या वाजवत आनंद उत्सव देखील साजरा करण्यात आला.












Click it and Unblock the Notifications