मराठमोळा ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळे पॅरिसहून भारतात परतला, दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत
मुंबई - ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्यपदक मिळवून देणारा भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याचं मायदेशी भारतात आगमन झालं आहे. दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं असून यानंतर तो आपल्या मुळ गावी कोल्हापुरात पोहचणार आहे.
कोल्हापुरातही स्वप्निल कुसळे याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. स्वप्निलनं ज्यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकल. त्याचवेळी त्याच्या गावात कोल्हापुरातील कांबळवाडीत दिवाळी साजरी झाली होती. महाराष्ट्र सरकारने स्वप्निलला एक कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.

50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कास्यपदक प्राप्त
स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत त्याने 590 गुण मिळवले आणि सातवे स्थान पटकावले. त्यानंतर त्यानं अंतीम फेरीत तिसरे स्थान पटकावत देशाला कास्यपदक मिळवून दिलं आहे.
कोल्हापुरच्या राधानगरीत जन्म
स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील भारतीय नेमबाज आहे. त्यांचा जन्म 1995 मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. 2009 मध्ये, त्यांच्या वडिलांनी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत त्याला दाखल केले. एक वर्षाच्या कठोर शारीरिक प्रशिक्षणानंतर, स्वप्निल कुसळेला एक खेळ निवडावा लागला आणि त्याने नेमबाजीची निवड केली.
स्वप्निलचे नेमबाजीवर अतिशय प्रेम आहे, त्याने आतापर्यंत यासाठी प्रचंड मेहनत घेतली. स्वप्निलला खेळातून विश्रांती मिळाल्यावत तो जेव्हा जेव्हा घरी येतो, तेव्हा तो घरच्याच जेवणाला प्राधान्य देतो. बाहेरचे खाणे टाळतो. सकाळी नाश्त्याला त्याला तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी खायला आवडते, असेही त्याच्या वडिलांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले.
स्वप्निलचे करिअर
2015 मध्ये, त्याने कुवेत येथे 2015 आशियाई नेमबाजी स्पर्धेत कनिष्ठ गटात 50 मीटर रायफल प्रोन 3 मध्ये सुवर्णपदक जिंकले
तुघलकाबाद येथे झालेल्या 59 व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत गगन नारंग आणि चैन सिंग यांच्यापुढे स्वप्निलने विजय मिळवला.
तिरुअनंतपुरम येथे झालेल्या 61 व्या राष्ट्रीय स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र
17 मे 2024 रोजी, भोपाळ येथील MP राज्य नेमबाजी अकादमी रेंज येथे झालेल्या अंतिम ऑलिम्पिक चाचण्यांमध्ये भाग घेतल्यानंतर त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवले. दिल्ली आणि भोपाळ येथे झालेल्या पहिल्या तीन चाचणीनंतर ही चौथी आणि अंतिम चाचणी होती.
2022 मध्ये, त्याने कैरो, इजिप्त येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानावर राहून पुरुषांच्या 50-मीटर रायफल 3-पोझिशन इव्हेंटसाठी ऑलिम्पिक कोटा बर्थ मिळवला.
पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या अंतिम चाचण्यांमध्ये स्वप्नील पाचव्या स्थानावर राहिला. सुरुवातीच्या तीन चाचण्यांमध्ये त्याच्या प्रभावी स्कोअरमुळे त्याला दुसरा नेमबाज म्हणून निवडण्यात आले.
असा घडला स्वप्निल कुसळे
अभिनव बिंद्रा 2008 च्या ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत खेळताना पाहण्यासाठी 12वीच्या वर्गातील बोर्डाच्या परीक्षेकडे त्याने दुर्लक्ष केलं होतं असं सांगण्यात येतं. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाल्यावर त्याचा क्रीडा प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.
टीटीई म्हणून रेल्वेत नोकरी
स्वप्नील 2015 पासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागात प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) म्हणून भारतीय रेल्वेत नोकरीला आहे. स्वप्नीलसाठी सर्वात आव्हानात्मक काळ हा दीर्घकालीन आरोग्याच्या समस्येसंदर्भात होता. शारीरिक संघर्षांमुळे उद्भवला जो विशेषतः भोपाळमध्ये ऑलिम्पिक चाचण्यांच्या अंतिम सेटच्या आधी समस्या बनली होती.
सुरुवातीच्या फेरीत क्विंटी रोफेन आणि रीना परहत यांचा पराभव केला त्यानंतर त्याला टॉन्सिलच्या दीर्घकालीन समस्येचा सामना करावा लागला जो गेल्या काही वर्षांपासून वारंवार होत होता. तीव्र वेदना, ताप आणि अशक्तपणाही येत होता. अनेक डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर, शेवटी डिसेंबरमध्ये मूळ कारण स्पष्ट झालं. स्वप्नीलला लैक्टोज अव्हाईड असल्याचे निश्चित करण्यात आलं आणि त्याला त्याच्या आहारातून दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला.












Click it and Unblock the Notifications