मराठमोळ्या स्वप्निलनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडवला इतिहास! देशाला मिळवून दिलं कास्यपदक
नवी दिल्ली - कोल्हापूरचा मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसळे याने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला असून भारतासाठी कास्यपदक मिळवून दिलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्निल कुसळेने 590 गुणांसह 50 मीटर थ्री पोजिशनच्या पुरुष गटात अंतीम फेरीत धडक मारली होती. अंतीम फेरीत त्याने पदक मिळवलं आहे.
लाईव्ह अपडेट्स
- स्वप्निल कुसळेचा सामना सुरु, सहाव्या क्रमांकावर पोहचला.
- रायफल थ्री पोजिशन मेन्स अंतीम सामन्यात स्वप्निल पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
- स्वप्निलचा पहिला शाॅट 10.8 इतका होता.
- स्वप्निल 310.1 गुण मिळवून स्वप्निल पाचव्या स्थानावर कायम
- दुसरी फेरी पूर्ण आता तिसरी फेरी सुरु
- स्वप्निल कुसळे चोथ्या स्थानावर पोहचला. तिसऱ्या स्थानासाठी 0.1 चे अंतर तर पहिल्या स्थानासाठीचे अतंर 0.4 एवढे.
- स्वप्निल कुसळे दुसऱ्या स्थानावर पोहचला.
- एलिमेनेशन राऊंडपुर्वी स्वप्निल तिसऱ्या स्थानावर.
- स्वप्निलनं कास्यपदकं मिळवलं.

काय म्हणाले स्वप्निलचे वडील?
स्वप्निलचे वडिल म्हणाले की, गेली बारा तेरा वर्ष स्वप्निल कुसळेचा सराव खडतर होता. त्याचे एकच ध्येय आहे की, देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून द्यायचे आहे. आम्हाला खात्री आहे की, स्वप्निल देशाचा शंभर टक्के पदक मिळवून देईल. स्वप्निल आठवीनंतर तो नेमबाजीच्या खेळात नाव उंचावत आहे.
स्वप्निलला सर्वांचा आशीर्वाद - आई
स्वप्निलची आई म्हणाली, महाराष्ट्राचा स्वप्निल जगात जिंकणार आहे, अशी आम्हाला खात्री आहे. विश्वास वाटतो तो जिंकेल. सामना संपल्यानंतर तो आमच्याशी संवाद साधेल. आम्ही त्याचा सामना बघणार आहोत. देवांसह सर्वांचा आम्हाला आशीर्वाद आहे.
तो मोठी झेप घेईल - भाऊ
स्वप्निलचा भाऊ म्हणाला, मला माझ्या भावाचा खूप अभिमान वाटतो. तो ऑलिम्पिकमध्ये शुटींगच्या फायनलमध्ये खेळतोय यामागे त्याची मेहनत, त्याचे कष्ट आहेत. तो ऑलिम्पिकमध्ये तो सुवर्णनेम साधेल अशी आम्हाला खात्री वाटते. तो मोठी झेप घेईल असेही आम्हाला वाटते.
...अन् स्वप्निलनं देशाला मिळवू दिलं पदक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज रायफल नेमबाज स्वप्नील कुसळेकडून भारताला पदक मिळवलं. त्यानं 50 मी. रायफल थ्री पोझिशनच्या पुरुष गटातील अंतिम सामन्यात जोरदार खेळ केला. त्याने सहाव्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर झेप घेत हे पदक मिळवलं.
सिफ्ट कौर समारा आणि अंजुम मुदगिल याच स्पर्धेच्या महिला गटाच्या पात्रता फेरीत सहभागी होतील. तसेच, बॉक्सर निखत जरीन 50 किलो वजनी गटातील उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे.
बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनचा सामना उपउपांत्यपूर्व फेरीत एचएस प्रणॉयशी होणार आहे. पीव्ही सिंधू राउंड-16 च्या सामन्यासाठी रात्री 10 वाजता कोर्टवर जाणार आहे.
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या खेळांच्या सहाव्या दिवशी एकूण 18 सुवर्णपदके पणाला लागली आहेत. यापैकी 3 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदकांचे दावेदार असतील. भारताला आतापर्यंत केवळ 2 कांस्यपदक जिंकता आले आहे. दोन्ही पदके नेमबाजीतून मिळाली आहेत.












Click it and Unblock the Notifications