Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवणारा मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसळे कोण आहे? वाचा

मुंबई - कोल्हापूरच्या राधानगरीतल्या पठ्ठ्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मैदान गाजवलं. त्यानं भारतासाठी कास्यपदक मिळवून दिलं आहे. याचा समस्त भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

स्वप्नील कुसळेनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत त्याने 590 गुण मिळवले आणि सातवे स्थान पटकावले. त्यानंतर पदक मिळवून दिलं पण शेतकऱ्याचा मुलगा स्वप्निल कुसळे कोण हे माहित नसेल तर चला जाणून घेऊया त्याच्याबद्दल...

Indian Shooter swapnilkusales Shooting Competition Final Fare Latest Updates

कोल्हापुरच्या राधानगरीत जन्म

स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील भारतीय नेमबाज आहे. त्यांचा जन्म 1995 मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. 2009 मध्ये, त्यांच्या वडिलांनी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत त्याला दाखल केले. एक वर्षाच्या कठोर शारीरिक प्रशिक्षणानंतर, स्वप्निल कुसळेला एक खेळ निवडावा लागला आणि त्याने नेमबाजीची निवड केली.

तांदळाची भाकरी अन् मेथीची भाजी

स्वप्निलचे नेमबाजीवर अतिशय प्रेम आहे, त्याने आतापर्यंत यासाठी प्रचंड मेहनत घेतली. स्वप्निलला खेळातून विश्रांती मिळाल्यावत तो जेव्हा जेव्हा घरी येतो, तेव्हा तो घरच्याच जेवणाला प्राधान्य देतो. बाहेरचे खाणे टाळतो. सकाळी नाश्त्याला त्याला तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी खायला आवडते, असेही त्याच्या वडिलांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले.

Indian Shooter swapnilkusales Shooting Competition Final Fare Latest Updates

स्वप्निलचे करिअर

  • 2015 मध्ये, त्याने कुवेत येथे 2015 आशियाई नेमबाजी स्पर्धेत कनिष्ठ गटात 50 मीटर रायफल प्रोन 3 मध्ये सुवर्णपदक जिंकले
  • तुघलकाबाद येथे झालेल्या 59 व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत गगन नारंग आणि चैन सिंग यांच्यापुढे स्वप्निलने विजय मिळवला.
  • तिरुअनंतपुरम येथे झालेल्या 61 व्या राष्ट्रीय स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

  • 17 मे 2024 रोजी, भोपाळ येथील MP राज्य नेमबाजी अकादमी रेंज येथे झालेल्या अंतिम ऑलिम्पिक चाचण्यांमध्ये भाग घेतल्यानंतर त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवले. दिल्ली आणि भोपाळ येथे झालेल्या पहिल्या तीन चाचणीनंतर ही चौथी आणि अंतिम चाचणी होती.
  • 2022 मध्ये, त्याने कैरो, इजिप्त येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानावर राहून पुरुषांच्या 50-मीटर रायफल 3-पोझिशन इव्हेंटसाठी ऑलिम्पिक कोटा बर्थ मिळवला.
  • पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या अंतिम चाचण्यांमध्ये स्वप्नील पाचव्या स्थानावर राहिला. सुरुवातीच्या तीन चाचण्यांमध्ये त्याच्या प्रभावी स्कोअरमुळे त्याला दुसरा नेमबाज म्हणून निवडण्यात आले.

असा घडला स्वप्निल कुसळे

अभिनव बिंद्रा 2008 च्या ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत खेळताना पाहण्यासाठी 12वीच्या वर्गातील बोर्डाच्या परीक्षेकडे त्याने दुर्लक्ष केलं होतं असं सांगण्यात येतं. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाल्यावर त्याचा क्रीडा प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

टीटीई म्हणून रेल्वेत नोकरी

स्वप्नील 2015 पासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागात प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) म्हणून भारतीय रेल्वेत नोकरीला आहे. स्वप्नीलसाठी सर्वात आव्हानात्मक काळ हा दीर्घकालीन आरोग्याच्या समस्येसंदर्भात होता. शारीरिक संघर्षांमुळे उद्भवला जो विशेषतः भोपाळमध्ये ऑलिम्पिक चाचण्यांच्या अंतिम सेटच्या आधी समस्या बनली होती.

सुरुवातीच्या फेरीत क्विंटी रोफेन आणि रीना परहत यांचा पराभव केला त्यानंतर त्याला टॉन्सिलच्या दीर्घकालीन समस्येचा सामना करावा लागला जो गेल्या काही वर्षांपासून वारंवार होत होता. तीव्र वेदना, ताप आणि अशक्तपणाही येत होता. अनेक डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर, शेवटी डिसेंबरमध्ये मूळ कारण स्पष्ट झालं. स्वप्नीलला लैक्टोज अव्हाईड असल्याचे निश्चित करण्यात आलं आणि त्याला त्याच्या आहारातून दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+