ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनू भाकर सरबज्योत सिंहनं रचला इतिहास! शुटींगमध्ये या जोडीनं मिळवलं कास्यपदक
ऑलिम्पिकमध्ये आज चौथ्या दिवशी भारतानं आणखी एक कांस्यपदक जिंकलं. स्टार शुटर मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांच्या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकावलं.
या जोडीनं इतिहास घडवत अप्रतिम कामगिरी केली असून मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी पहिली महिला बनली आहे.

रिपब्लिक कोरियाविरुद्ध अप्रतिम कामगिरी
पात्रता फेरीतील तीन सत्रात मनूने 193, 195 आणि 192, तर सरबजोतने 194, 194 आणि 191 गुण मिळवले.या दोघांनी मिळून एकूण 580 गुण मिळवले. मनू आणि सरबजोत जोडीनं रिपब्लिक ऑफ कोरियाविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली.
एकाच ऑलिम्पिकमध्ये मनूला 2 पदकं
मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या सामन्यात कोरियन जोडीचा 16-10 असा पराभव केला. पॅरिसमधील पहिल्या यशानंतर 48 तासांनंतर मनू भाकरने आणखी एक कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
पहिलं पदक जिंकल्यावर मनूच्या वडिलांची प्रतिक्रीया
मनू भाकर हिचे वडिल रामकिशन भाकर म्हणाले, माझ्यापेक्षा माझ्या सोसायचीचे लोकच जास्त खूश झाले आहेत. पूर्ण देश आज आनंदी झाला आहे.मनूने ऑलम्पिक मेडलने जी सुरुवात केली. अजून मनूचे काही इव्हेंट्स बाकी आहेत. मनूच्या विजयाने मी देशवासीयांचे आभार मानतो. त्यांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली. विशेषतः पत्रकार आणि माध्यमांनी मनूचा आत्मविश्वास वाढवला. तिला सपोर्ट केला.
वैयक्तिक कास्य जिंकल्यानंतर काय म्हणाली होती मनू?
पहिलं पदक जिंकल्यानंतर मनूने सांगितले की, हे असे पदक आहे ज्याची भारत खूप दिवसांपासून वाट पाहत होता. मनू भावूकपणे म्हणाली, "मला या विजयाने खूप आनंद झाला आहे. हे ते पदक आहे ज्याची भारत खूप दिवसांपासून वाट पाहत होता. मी फक्त एक माध्यम आहे. भारत अधिकाधिक पदकांना पात्र आहे आणि आम्ही हे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत." जास्तीत जास्त पदके जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज मनू भाकर मिळवू शकते दुसरे पदक! जाणून घ्या भारतीय खेळाडूंच्या सामन्यांची वेळ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज मनू भाकर मिळवू शकते दुसरे पदक! जाणून घ्या भारतीय खेळाडूंच्या सामन्यांची वेळ
मनू म्हणाली, "ही भावना माझ्यासाठी अतिवास्तव आहे. मी खूप मेहनत केली. शेवटच्या शॉट्समध्ये मी माझी सर्व शक्ती वापरली. मी कांस्यपदक जिंकू शकलो याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की पुढच्या वर्षी पदकाचा रंग बदलेल. " मी करू शकतो."












Click it and Unblock the Notifications