भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत! पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लडचा 4-2 ने पराभव, पदकासाठी हवा एक विजय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. सामन्यात दोन्ही संघांची धावसंख्या 1-1 अशी बरोबरी होती. त्यानंतर हा सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला.
भारताने शूटआऊटमध्ये सलग 4 गोल केले. ब्रिटीश संघाला दोनच गोल करता आले. भारताचा गोलरक्षक श्रीजेश विजयाचा हिरो ठरला, त्याने 2 गोल वाचवले. त्यामुळे श्रीजेश या सामन्याचा हिरो ठरला आहे.

48 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळला भारत
भारतीय संघाचा हा विजयही महत्त्वाचा आहे कारण संघ केवळ 10 खेळाडूंसह खेळत होता. भारताचा बचावपटू अमित रोहिदास 60 मिनिटांच्या खेळातील 48 मिनिटे सामन्याबाहेर होता. रेफ्रींचा हा निर्णय वादात सापडला. 12व्या मिनिटाला त्याला रेफ्रींनी रेड कार्ड दिलं. या फाऊलसाठी पिवळं कार्ड देणं पुरेसं होतं, असं माजी भारतीय ऑलिम्पियन जुगराज सिंग यांनी सांगितलं.
असा रंगला सामना
पहिल्या क्वार्टरनंतर भारताचा अमित रोहिदास याला रेड कार्ड देण्यात आलं. त्यामुळं तो बाहेर गेला. यानंतर भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग यानं एक गोल केला. त्यानंतर ब्रिटनच्या ली मॉर्टन यानं गोल केल्यानं सामन्यात 1-1 अशी बरोबरी झाली.
ब्रिटनकडून पहिला गोल जेम्स एल्बेरी यानं केला. यानंतर कॅप्टन हरमनप्रीत सिंह यानं गोल करताना ग्रेट ब्रिटनच्या गोल कीपरला चकवा दिला आणि भारताकडून पहिला गोल केला. यानंतर ब्रिटननं एक गोल केला. भारताकडून सुरजीत आणखी एक गोल केला. इंग्लंडचे यापुढचे दोन गोल करण्याचे प्रयत्न भारताचा गोल कीपर पीआर श्रीजेशनं हाणून पाडला. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताकडून तिसरा गोल ललितनं केला. भारताकडून चौथा गोल राजकुमार पाल यानं केला. भारतानं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता 6 ऑगस्टला होणार आहे.
श्रीजेशची शेवटची स्पर्धा
2 गोल वाचवणारा पीआर श्रीजेश आपली शेवटची स्पर्धा खेळत आहे. हा 36 वर्षांचा अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेश काही दिवसांपूर्वी म्हणाला होता - 'पॅरिस ऑलिम्पिक ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.'
भारताने शूटआऊट जिंकला, सर्व प्रयत्नांत गोल
भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा 4-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
- हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, ललित उपाध्याय आणि राजकुमार पाल यांनी शूटआऊटमध्ये भारताकडून यशस्वी गोल केले.
- इंग्लंडसाठी जेम्स ॲल्व्हरीने पहिल्या प्रयत्नात आणि जॅक वॉलिसने दुसऱ्या प्रयत्नात गोल केले.
- तिसऱ्या प्रयत्नात कॉनर विल्यमसनला गोल करता आला नाही
- चौथ्या प्रयत्नात फिलिप रोपरला गोल करता आला नाही, भारताचा अनुभवी गोलरक्षक श्रीजेशने अप्रतिम बचाव केला.












Click it and Unblock the Notifications