Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताचं हाॅकीचं सूवर्णपदक हिसकावण्याचं षडयंत्र? उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास 'या' खेळाडूला बंदी!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठी शिकस्त केल्यानंतर भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पण भारतीय संघाच्या मार्गात काही कमी अडथळे नाहीत. अविश्वसनीयरित्या भारतानं ग्रेट ब्रिटनविरुद्धचा सामना फक्त दहा खेळाडूंसह खेळून जिंकला.

आता भारत सुवर्णपदकाचा दावेदार आहे पण भारताचं सभांव्य सुवर्णपदकच हिरावून घेण्याचं षडयंत्रत तर नाही ना अशी शंका येत आहे, कारण भारताला सामना जिंकून देऊ शकणाऱ्या स्टार खेळाडूवर उपांत्य फेरीतील सामन्यात खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Paris Olympics 2024 Amit Rohidas banned from hockey semi-final match

कालच्या सामन्यात काय घडलं?

ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतीय संघातील आश्वासक खेळाडूला लाल कार्ड देऊन बाहेर बसवण्यात आले. त्या खेळाडूचं नाव आहे, अमित रोहिदास. त्याला उपांत्यफेरीतील सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

उपांत्यपूर्व सामन्यादरम्यान अमित आणि विरोधी खेळाडू विल कॅलनन यांच्यात खडाजंगी झाली होती. अमितची काठी ब्रिटिश खेळाडूला लागली होती. यानंतर हे प्रकरण टीव्ही अंपायरकडे गेलं आणि भारतीय खेळाडूला लाल कार्ड देऊन सतराव्या मिनिटाला खेळातून बाहेर बसवण्यात आलं.

भारतीय खेळाडू 10 खेळाडूंसह खेळला

यानंतर भारतीय संघ फक्त 10 खेळाडूंसह खेळला आणि सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडियानं पेनल्टी शूटआऊटवर विजय मिळवला. येथून आणखी एक घटना उघडकीस आली. ज्या अंपायरनं रेड कार्ड दाखवलं तो जर्मनीचा होता आणि आता होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना जर्मनीशी होऊ शकतो हे कदाचित त्याला कळले असेल. त्यामुळे हे षडयंत्र वाटते.

...म्हणून असू शकतं षडयंत्र?

अशा परिस्थितीत रोहिदाससारख्या स्टार खेळाडूवर बंदी घालण्याची आयता मार्गच शोधला गेला. ग्रेट ब्रिटनसोबतच्या सामन्यात अमित रोहीदासवर बंदी घातल्यानंतर एफआयएचने अमितवर उपांत्य फेरीच्या सामन्यातही बंदी घातली आहे. आता तो या सामन्याचा भाग नसून भारतासाठी हा मोठा धक्का आहे.

ग्रेट ब्रिटनविरुद्ध असा जिंकला भारतीय संघ

  • भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा 4-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
  • हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, ललित उपाध्याय आणि राजकुमार पाल यांनी शूटआऊटमध्ये भारताकडून यशस्वी गोल केले.
  • इंग्लंडसाठी जेम्स ॲल्व्हरीने पहिल्या प्रयत्नात आणि जॅक वॉलिसने दुसऱ्या प्रयत्नात गोल केले.
  • तिसऱ्या प्रयत्नात कॉनर विल्यमसनला गोल करता आला नाही
  • चौथ्या प्रयत्नात फिलिप रोपरला गोल करता आला नाही, भारताचा अनुभवी गोलरक्षक श्रीजेशने अप्रतिम बचाव केला.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+