इंग्लड दौऱ्यावर खेळायला गेल्यानंतर तरुणीवर बलात्कार! पाकिस्तानचा क्रिकेटपटू गोत्यात, कोण आहे तो वाचा
Pakistani cricketer Haider Ali accused of rape : पाकिस्तानी खेळाडू आपल्या खेळातील कारनामे अथवा वादग्रस्त विधानांमुळे नेहमी वादात सापडतात, पण यावेळी जे घडले ते धक्कादायक होते, इंग्लड दौऱ्यावर गेल्यानंतर एका पाकिस्तानी खेळाडूवर जे आरोप लागले त्यामुळे हा क्रिकेटपटू आता गोत्यात आला आहे. त्याला पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने निलंबित केले असून आता बलात्कार प्रकरणात चौकशी केली जात आहे.
बलात्कारेच आरोप झालेला क्रिकेट पटू दुसरा तिसरा कुणी नसून तो पाकिस्तानचा युवा खेळाडू हैदर अली आहे. बलात्काराचे आरोप झालेल्या या पाकिस्तानी स्टार खेळाडूने विश्वचषकात भारताचा सामना खेळला होता. आता त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. अलीकडेच इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. २३ जुलै रोजी पाकिस्तान अ संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना मँचेस्टरच्या एका ठिकाणी ही अत्याचाराची घटना घडली असे वनइंडिया हिंदीने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून निलंबन
मिडिया रिपोर्टनुसार, बलात्कार प्रकरणात हैदर अली यांचे नाव समोर आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. हैदर अली निलंबितरेटर मँचेस्टर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पाक क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांकडून गुन्हेगारी चौकशीची माहिती देण्यात आली आहे, जी हैदर अलीशी संबंधित आहे. हे प्रकरण पाकिस्तान शाहीनच्या इंग्लंड दौऱ्यातील एका घटनेशी संबंधित आहे.
हैदर अली कोण आहे?
- हैदर अली हा अवघ्या २४ वर्षांचा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे.
- हैदर पाकिस्तान क्रिकेट संघाचा उदयोन्मुख स्टार मानला जातो.
- हैदरने सप्टेंबर २०१९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १ सप्टेंबर २०२० रोजी त्याने पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- हैदर अलीचा जन्म २ ऑक्टोबर २००० रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला आहे.
- २३ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यातही हैदर अली खेळला होता.
- २०१९ मध्ये, पेशावर झल्मीने त्याला PSL मध्ये निवडले होते.
- २०२० मध्ये, त्याने PSL मध्ये सर्वात तरुण अर्धशतक झळकावण्याचा विक्रम देखील केला.
- २०२१ मध्ये, त्याची इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात निवड झाली होती, परंतु बायो-बबल तोडल्याबद्दल त्याला वगळण्यात आले. नंतर त्याला पाकिस्तान शाहीनचा उपकर्णधारही बनवण्यात आला.
- २०२२ मध्ये, हैदरला आशिया कपसाठी पाकिस्तान संघात स्थान मिळाले. आतापर्यंत त्याने पाकिस्तानसाठी २ एकदिवसीय आणि ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
- अलीकडेच इंग्लंड दौऱ्यावर, त्याने सर्व तीन ५० षटकांचे सामने आणि दोन तीन दिवसीय सामने खेळले.












Click it and Unblock the Notifications