Nz vs Sa T20 women : न्यूझीलंडच्या रणरागिणींनी जिंकला वर्ल्डकप; दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव
ICC Women's T20 World Cup 2024 Final, NZ vs SA : महिला T-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या ट्रॉफीवर न्यूझीलंड संघाने नाव कोरले आहे. त्यामुळे महिला T-20 वर्ल्ड कप स्पर्धेला न्यूझीलंडच्या रुपात नवा विजेता मिळाला आहे.
न्यूझीलंड महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाला 32 धावांनी पराभवाचा धक्का दिला.न्यूझीलंडने प्रथमच महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज (20 ऑक्टोबर) अंतिम सामना पार पडला.

दक्षिण आफ्रिकेसाठी 5 महिन्यातील हा टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील दुसरा पराभव आहे. महिला संघापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ जून महिन्याच्या अखेरीस पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध पराभूत झाला होता.
रविवारचा दिवस न्यूझीलंडसाठी खास
तर रविवारचा दिवस न्यूझीलंड क्रिकेटसाठी खास ठरला आहे. याचदिवशी सकाळी पुरुष संघाने भारताला 36 वर्षांनी मायदेशात कसोटी सामन्यात पराभूत केले, तर रात्री महिला संघाने विश्वविजयावर नाव कोरले आहे.
New Zealand players bask in #T20WorldCup glory 😍#SAvNZ #WhateverItTakes pic.twitter.com/8Y0U7iNOUE
— ICC (@ICC) October 20, 2024
अमेलिया केरने सर्वाधिक धावा केल्या
न्यूझीलंडकडून अमेलिया केरने 43, ब्रुक हॅलिडेने 38 आणि सुझी बेट्सने 32 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको मलाबाने सर्वाधिक 2 बळी घेतले. क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क आणि अयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. किवी संघ तब्बल 14 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी हा संघ 2009 आणि 2010 या दोन्ही विश्वचषकांच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका सलग दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहे, 2023 मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.












Click it and Unblock the Notifications