Neeraj Chopra Net Worth : गोल्डनबाॅय नीरज चोप्रा किती संपत्तीचा आहे मालक? कोण आहे त्याची पत्नी, वाचा
Neeraj Chopra Net Worth : भारताचा गोल्डनबाॅय नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेत विक्रम रचला आहे. जे ऑलिम्पिकमध्ये तो करू शकला नाही, ती कामगिरी त्याने केली आहे. त्याने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत 90.23 मीटरपर्यंत भाला फेकला आहे.
भारतातर्फे सर्वात जास्त लांब भाला फेकण्याचा त्याने हा विक्रम केला आहे. त्याच्या नावावर राष्ट्रीय विक्रमही आहे. असा हा दमदार भारतीय खेळाडू लष्करात लेफ्टनंट कर्नल हे पद त्याला भारताच्या राष्ट्रपतींनी दिले आहे.

टोकियोत घेतला सुवर्णवेध
भालाफेक क्रीडा प्रकारात भारताला टोकिया येथे2021 मध्ये झालेल्या ऑलम्पिक मध्ये जेवलिन थ्रो म्हणजे भाला फेक या क्रीडा प्रकारात सूवर्ण मिळवून देत त्याने इतिहास घडवला होता. भारताच्या गोल्डनबाॅय नीरज चोप्रा आधी लष्करात नायब सुभेदार पदावर होता, त्याला आणखी एक बहुमान मिळाला आहे. अभिमानाने छाती फुलावी अशी गोष्ट घडली. भारतीय लष्करात आता नीरज चोप्राचा लेफ्टनंट कर्नल म्हणून राष्ट्रपतींकडून सन्मान झाला आहे. अलिकडचा विचार केल्यास क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यानंतर तो तिसरा क्रीडापटू ठरला आहे.
नीरज चोप्राची एकूण संपत्ती किती?
- 2024 पर्यंत, चोप्राची एकूण संपत्ती अंदाजे 37 कोटी रुपये आहे.
- नीरज चोप्राची कमाई मॅचचे मानधन आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून येते.
- नीरज चोप्रा मासिक 30 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो.
- नीरज चोप्राचे वार्षिक उत्पन्न 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
नीरज चोप्राची पत्नी कोण आहे?
लग्नाच्या बेडीत अडकलेल्या नीरज चोप्राची पत्नी कोण याबद्दल अनेकजणांना उत्सुकता आहे. आपल्या आवडत्या खेळाडूची पत्नीबद्दल अनेक चाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. भालाफेकपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्राची पत्नी हिमानी ही आहे. त्याने आपल्या लग्नानंतर इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी संदेश पोस्ट केला होता. "नीरज (हर्टशेप इमोजी) हिमानी, प्रेमबंधन" असे पोस्टमध्ये त्याने लिहिलेले होते. नीरजने त्याचे वैयक्तिक आयुष्य खूप काळ खाजगी ठेवले आहे. हिमानीशी लग्न केल्याची माहिती दिल्यापासून, त्याच्या इंस्टाग्रामवर जगभरातील चाहत्यांकडून अभिनंदन संदेश आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पहलगाम हल्ल्यावर काय होती नीरज चोप्राची भावना?
अलिकडेच नीरज चोप्रा याने पहलगाम हल्ल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, यात भारताचा गोल्डनबाॅय नीरज चोप्राही मागे नव्हता. सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करुन त्याने म्हटले होते की, "जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद हल्ल्याने मन दुखावले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना."












Click it and Unblock the Notifications