इतिहास घडला! नागपूरची बुद्धीबळाची राणी दिव्या देशमुख बनली चेसची वर्ल्ड चॅम्पियन, बक्षीस रक्कम किती?
chess queen Divya Deshmukh News : भारतीय बुद्धिबळ विश्वात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. युवा बुद्धिबळपटू नागपूरची कन्या दिव्या देशमुख हिने जगप्रसिद्ध ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला हरवून FIDE महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा ऐतिहासिक किताब पटकावला आहे. या विजयामुळे दिव्या ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
सोमवारी झालेल्या अंतिम सामन्याच्या टायब्रेक फेरीनंतर दिव्याने अनुभवी हम्पीवर 2.5 - 1.5 अशी आघाडी घेत विजेतेपद निश्चित केले. या दिमाखदार विजयासोबतच दिव्याला $50,000 (सुमारे 41 लाख रुपये) इतकी मोठी पारितोषिकाची रक्कमही मिळाली आहे.

क्लासिकल डावांनंतर टायब्रेकचा थरार
अंतिम फेरीतील दोन्ही क्लासिकल सामने 1-1 अशा बरोबरीत सुटल्याने, विजेतेपदाचा निर्णय घेण्यासाठी टायब्रेक खेळवण्यात आले.
या टायब्रेकमध्ये प्रत्येकी 10 मिनिटे वेळ आणि प्रत्येक चालीसाठी 10 सेकंद इन्क्रिमेंट असलेले दोन रॅपिड डावे खेळवले गेले. दिव्याने मागील रात्रीच टॉस जिंकून पहिल्या रॅपिड डावात पांढऱ्या चाळींचा पर्याय निवडला.
तिने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत हम्पीला वेळेच्या दडपणाखाली खेळायला भाग पाडले, ज्यामुळे तिला निर्णायक आघाडी घेण्यास मदत झाली.
रॅपिड गेम 1 - टक्कर आणि चुका
पहिल्या रॅपिड डावात दिव्याने हम्पीवर जोरदार हल्ला चढवला. अनुभवी हम्पीने सुरुवातीला शांतपणे खेळत वेळ खेचली आणि बचावावर लक्ष केंद्रित केले. एका क्षणी, दिव्याकडून एक मोठी चूक झाली.
तिने मधला प्यादा न सावरता सोडला, ज्यामुळे हम्पीला एक चांगली संधी मिळाली. हम्पीने राणी बदलण्याचा प्रस्ताव दिला, परंतु दिव्याने तो नाकारला. अखेरीस, तिला राणीचा बळी द्यावा लागला, पण तरीही तो सामना अनिर्णीत राखण्यात दिव्याला यश मिळाले.
19-year-old Divya Deshmukh is in tears after winning the 2025 FIDE Women's World Cup! pic.twitter.com/DuFYH0bqT5
— chess24 (@chess24com) July 28, 2025
सामना जिंकताच दिव्या रडू लागली
सामना जिंकल्यानंतर दिव्याला तिच्या भावनांना आवर घालता आला नाही. ती जेतेपद जिंकल्याच्या आनंदात भावनिक झाली. ती तिच्या सीटवर बसून रडू लागली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोमवारी झालेल्या सामन्यात दिव्याने पांढऱ्या तुकड्यांसह सुरुवात केली आणि आक्रमक वृत्ती दाखवली.
आतापर्यंत चीनने या स्पर्धेत वर्चस्व गाजवले होते. पण भारतीय महिलांनी ते मोडून काढले आणि अंतिम फेरीत दोन्ही खेळाडू भारताच्या होत्या. दिव्या आणि कोनेरू हम्पीने अनेक चिनी खेळाडूंना पराभूत करून येथे पोहोचण्याचा पराक्रम केला.
हे ही वाचा : Who is Divya Deshmukh : वर्ल्ड चेस चॅम्पियनशीपमध्ये दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती! कोण आहे ती? वाचा
दिव्या देशमुखची बक्षीस रक्कम!
दिव्या आणि हम्पी दोघांनाही या प्रवासासाठी चांगली बक्षीस रक्कम मिळाली आहे. जेतेपद जिंकल्याबद्दल दिव्या देशमुखला 42 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे.
तिच्यासोबत उपविजेत्या असलेल्या हम्पीलाही 30 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली आहे. दोन्ही खेळाडूंनी प्रतिष्ठित 'कॅन्डिडेट्स' स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
दिव्या देशमुख कोण आहे
दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातील नागपूर शहरातील रहिवासी आहे आणि तिचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. तिचे पालक डॉ. जितेंद्र देशमुख आणि डॉ. नम्रता देशमुख दोघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत.
दिव्याने तिचे सुरुवातीचे शिक्षण भवन भगवानदास पुरोहित विद्यालयातून पूर्ण केले आणि अगदी लहान वयातच तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. लवकरच तिने भारतीय बुद्धिबळ जगतात आपला ठसा उमटवला.












Click it and Unblock the Notifications