मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच विजयाने पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, कोण आहे अव्वल स्थानावर
IPL Points Table: मुंबईच्या वानखेडेवर स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने कोलकात्याचा 8 गडी राखून पराभव केला. गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबईने विजयाचे खातेही उघडले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने कोलकत्याचा मोठा फरकाने पराभव केला आहे.
मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवून विजयी खातं उघडल आहे. ज्यामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बद्दल झाला आहे. केकेआरला तीन सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आणि सलग दोन पराभवांनंतर मुंबईला पहिल्यांदाच विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली.

केकेआर विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये तळाशी होते आणि इतर सर्व संघ पाच वेळा विजेत्या संघापेक्षा पुढे होते. यानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने त्यांच्या घरात मैदानावर विजय मिळवला. फक्त 13 व्या षटकात केकेआरला हरवणाऱ्या मुंबई इंडियन्सने पॉइंट्स टेबलमध्ये पाच स्थानांनी झेप घेतली. दहाव्या स्थानावर असलेल्या या संघाने चेन्नई, हैदराबाद, राजस्थान रॉयल्स सारख्या संघांना मागे टाकून आपले नाव नोंदवले आहे. मुंबई इंडियन्ससाठी हे चांगले संकेत आहेत.
दहाव्या स्थानावर असलेला मुंबई इंडियन्स आता सहाव्या स्थानावर आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज सातव्या आणि सनरायझर्स हैदराबाद आठव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स संघ नवव्या स्थानावर आहे तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआर दहाव्या स्थानावर आहे.
जर आपण अव्वल संघांबद्दल बोललो तर आरसीबीने तिथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आरसीबीने त्यांचे दोन्ही सामने खेळले आहेत आणि जिंकले आहेत. आरसीबी 4 गुणसह अव्वल क्रमांवर मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. लखनऊ तिसऱ्या क्रमांकवर, गुजरात चौथ्या क्रमांकवर आणि पंजाब पाचव्या क्रमांकवर आहे.
अशी आहे आयपीएलमधील पॉइंट्स टेबल
आरसीबी- 4 गुण
दिल्ली कॅपिटल्स- 4 गुण
लखनऊ सुपर जायंट्स- 2 गुण
गुजरात टायटन्स- 2 गुण
पंजाब किंग्ज- 2 गुण
मुंबई इंडियन्स- 2 गुण
चेन्नई सुपर किंग्ज- 2 गुण
सनरायझर्स हैदराबाद- 2 गुण
राजस्थान रॉयल्स- 2 गुण
केकेआर- 2 गुण












Click it and Unblock the Notifications