Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

MI vs GT: सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, मुख्य प्रशिक्षकाने केला खुलासा

Jasprit Bumrah Fitness Update: आयपीएल 2025 च्या 9व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुध्द मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. आजच्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट आली आहे.

भारताकडून बुमराह शेवटचा सामना 5 जानेवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या फिटनेसबद्दल पूर्वी असे वृत्त होते की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) कडून फिटनेस क्लिअरन्स मिळाल्यानंतर तो लवकरच मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होऊ शकतो, परंतु जयवर्धने ने या वृत्ताना आता पूर्णविराम दिला आहे.

jasprit bumrah

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी शुक्रवारी एक मोठी अपडेट दिली आहे. जयवर्धने ने म्हटलं आहे की, की स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अजूनही त्याच्या पाठीच्या दुखापतीतून बरा होत आहे आणि सध्या तो आयपीएल 2025 मध्ये एमआयकडून खेळण्याची शक्यता कमी आहे.

मुख्य प्रशिक्षक जयवर्धने यांचे विधान

जयवर्धने म्हणाला की, बुमराह वगळता आमच्या संघातील सर्व खेळाडू उपलब्ध आहेत. मी माझ्या मागील मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, तो त्याच्या दैंनदिन शेडयूलचं पालन करत आहे. आतापर्यंत सर्व काही ठीक दिसत आहे, परंतु एनसीएने कोणतीही स्पष्ट वेळ दिलेली नाही, म्हणून आपल्याला वाट पहावी लागेल.

बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची जबाबदारी कोणाकडे असेल?

बुमराहच्या अनुपस्थितीत दीपक चहर आणि ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्ससाठी वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर आणि इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स फिरकी विभागाचे नेतृत्व करत आहेत.

मुंबई इंडियन्स आज पहिल्या विजयासाठी प्रयत्न करणार

मुंबई इंडियन्सने त्यांच्या आयपीएल 2025 मोहिमेची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियमवर केली. मात्र याठिकाणी त्यांना चार विकेटने पराभव पत्करावा लागला. आता पाच वेळा विजेतेपद मिळवणारा संघ शनिवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पहिला विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल.

Take a Poll

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+