Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एम. एस धोनी आणि साक्षीचा पहाडी गाण्यावर डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल

MS Dhoni Dance Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल अशी ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी स्वत:ला लाइटलाइटपासून दूर ठेवणे नेहमीच पसंत करतो. सार्वजनिक ठिकाणीही धोनी फारसा दिसत नाही. मात्र धोनी बाईक किंवा लक्झरी कार चालवतानाचे व्हि़डीओ आपण अनेकदा सोशल मिडीयावर पाहिले आहेत.

दरम्यान धोनीचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते जाम खूश झाले आहेत. या व्हिडीओमध्ये माही त्याची पत्नी साक्षीसोबत पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. काही स्थानिक लोकांसोबत त्यांच्या स्टाईलमध्ये धोनी डान्स करताना दिसत आहे. हे गाणे इन्स्टाग्रामवरही खूप लोकप्रिय झालं आहे.

MS Dhoni Dance Video

धोनी त्याची पत्नी साक्षीसोबत इंस्टाग्राम रील्सवर व्हायरल झालेल्या 'ठुमक-ठुमक' गाण्यावर डान्स करतानाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हायरल व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. माहीचा हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतोय. स्थानिक लोकांनीही त्यांच्यासोबत नृत्याचा आनंद लुटला. ऋषिकेशमधील या गढवाली गाण्यावर माहीने डान्स केल्याचे सांगितले जात आहे.

महेंद्रसिंग आयपीएल 2025 मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणार आहे. संघाने त्याला कायम ठेवले आहे. धोनीला अनकॅप्ड कॅटेगरीत 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+