Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

MI vs UP LIVE : मुंबई इंडियन्सने टाँस जिंकून गोलंदाजी घेतली; युपी वाँरिअरर्सला पहिला धक्का

वुमेन्स प्रिमिअम लिगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यातील सामना सुरु झाला आहे. बेंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या महिला प्रीमियर लीग सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून यूपी वॉरियर्सविरुद्ध गोलंदाजीचा निर्णय घेतला. एमआयने आजच्या सामन्यासाठी आपल्या संघात एक बदल केला आहे. फिरकी गोलंदाज पारुनिका सासोदियाऐवजी वेगवान गोलंदाज जिंतीमणी कलिताला संधी दिली. तर यूपीडब्ल्यूने आपल्या पहिल्याच संघात मैदानात उतरवले आहे.

MI vs UP LIV

कशी होईल लढत?

मुंबई इंडियन्सने संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखले आहे. मुंबईच्या संघात सध्या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा जास्त आहे. त्यांचे ओपनरही चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. नव्या व जुन्या खेळाडूंचे योग्य संतुलन मुंबईच्या संघात दिसत आहे. दुसरीकडे युपी वाँरिअर्सही चांगला स्कोअर करताना दिसत आहे. युपी संघाकडेही नावाजलेले खेळाडू आहेत. युपीकडे मधल्या व अंतिम फळीतील फलंदाजीत चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. शक्तीशाली वेगवान गोलंदाज व जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज असलेला युपीचा संघ मुंबईशी कसा सामना करतो, हे थोड्याच वेळात समजणार आहे.

कसे आहे मैदान?

बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजीला अनुकूल आहे. मैदान छोटे असल्याने मोठी धावसंख्या उभारली जावू शकते. प्रथम फलंदाजी करताना येथे अनेकदा मोठ्या धावसंख्येचा आकडा नोंदवला गेला आहे. वेगवान आउटफिल्ड आणि संध्याकाळच्या सामन्यात दव घटकामुळे पाठलाग करणे देखील एक व्यवहार्य पर्याय आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना काही स्विंग मिळू शकते. परंतु चेंडू जुना होत असताना फलंदाजी करणे सोपे होते. फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये भूमिका बजावू शकतात. येथे १७० पेक्षा जास्त धावसंख्या स्पर्धात्मक मानली जात आहे.

कसा आहे प्लेईंग इलेव्हन?

यूपी वॉरियर्स : किरण नवगिरे, वृंदा दिनेश, दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, उमा छेत्री (कर्णधार), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, साईमा ठाकोर, क्रांती गौड

मुंबई इंडियन्स: यास्तिका भाटिया (कर्णधार), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजाना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माइल, जिंतीमणी कलिता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+