MI Vs PBKS: सूर्यकुमार यादवने IPL मध्ये रचना इतिहास; डिव्हिलियर्स, पंतला टाकले मागे, केली ही कामगिरी
MI Vs PBKS, ipl-2025 qualifier 2 : इंडियन प्रीमियर लीगचा क्वालिफायर-2 सामना रविवारी (दि.1 जून) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पावसामुळे हा सामना सुमारे 2 तास उशिराने सुरू झाला. पण जेव्हा मुंबई संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा सूर्यकुमार यादवने या सामन्यात इतिहास नवा विक्रम त्याच्या नावावर रचला आहे.
मुंबई इंडियन्सचा अतिशय जबरदस्त फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 च्या हंगामात आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याने नॉन-ओपनर म्हणून एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर रचला आहे.
सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 मध्ये 691 धावांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही नॉन-ओपनर फलंदाजाने केलेल्या धावांपेक्षा सर्वाधिक धावा आहेत.

यापूर्वी हा विक्रम 2016 मध्ये एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता, ज्याने 687 धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांचे मन जिंकले.
मधल्या फळीत खेळत असूनही, तो त्याच्या उत्कृष्ट स्ट्राईक रेट आणि उत्कृष्ट शॉट्ससाठी ओळखला जात असे. त्याच्या कामगिरीने केवळ त्याच्या संघाला बळकटी दिली नाही तर संपूर्ण हंगामात त्याचे महत्त्व देखील सिद्ध केले आहे.
यापूर्वी, 2018 मध्ये ऋषभ पंतनेही 684 धावा केल्या होत्या, परंतु सूर्यकुमार यादवने त्याला मागे टाकले. सूर्यकुमार यादवनेही आयपीएल 2023 मध्ये उत्तम खेळ दाखवला आणि 605 धावा केल्या.
आयपीएलच्या हंगामात नॉन-ओपनरच्या सर्वाधिक धावा
- 691* सूर्यकुमार यादव (2025)
- 687 एबी डिव्हिलियर्स (2016)
- 684 ऋषभ पंत (2018)
- 622 केन विल्यमसन (2018)
- 605 सूर्यकुमार यादव (2023)
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन)
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन)
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.












Click it and Unblock the Notifications