वादग्रस्त आहे रेकाँर्ड ब्रेकरचं आयुष्य; शमीला द्यावी लागते पत्नीला सव्वा लाखांची पोटगी
सगळ्यात कमी बाँलमध्ये २०० बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीने वर्ल्डरेकाँर्ड केला आणि त्याची पुन्हा चर्चा सुरु झाली. मात्र याच शमीचं वैवाहिक आयुष्यत अगदीच खडतर राहिलं आहे. त्याचं लग्न फक्त चार वर्षे टिकलं. शिवाय पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचार केल्याचाही आरोप केला होता. नेमकी कसं होतं शमीचं आयुष्य हेच आपण पाहूयात...

कोण होती शमीची पत्नी?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ ही आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची चीअरलीडर होती. याशिवाय ती मॉडेलिंगही करत होती. तिला अभिनयातही रस होता. शमी आणि हसीन जहाँ यांची भेट २०१२ मध्ये आयपीएल दरम्यान झाली. पहिल्याच नजरेत शम्मीने हसीनला त्याचे हृदय देऊन टाकल्याचे सांगितले जाते.
चीअरलीडरसोबत जुळले सुत
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्यात मैत्री सुरू झाली ती प्रेमात रूपांतरित झाली. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर ६ जून २०१४ रोजी लग्न केले. दोघांनीही कुटुंबियांच्या संमतीने लग्न केले. लग्नानंतर हसीन जहाँने तिचे मॉडेलिंग करिअर सोडले. जुलै २०१५ मध्ये शमी आणि हसीनला मुलगी झाली. परंतु संसारातले हे सुख फक्त तीन वर्षे टिकले. २०१८ मध्ये त्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली.
पत्नीने केले गंभीर आरोप
त्यानंतर मार्च २०१८ मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. शमीने मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप तिने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला. हसीन जहाँने तिच्या सोशल मीडियावर काही चॅट्सचे फोटो शेअर केले होते. शमीने इतर मुलींसोबत चॅट्स केल्याचा आरोप तिने केला होता. हसीन जहाँने शमीच्या वयाबद्दलही वाद निर्माण केला. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोपही झाला.
द्यावे लागतात दरमहा १.३० लाख
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ २०१८ पासून वेगळे राहत आहेत. दोघांचाही खटला न्यायालयात सुरू आहे. अलीकडेच न्यायालयाने हसीन जहाँच्या बाजूने निकाल दिला आणि मोहम्मद शमीला त्याच्या पत्नीला दरमहा १.३० लाख रुपये देण्याचे आदेश दिले. हसीन जहाँचा देखभाल भत्ता ५०,००० रुपये आहे आणि ८०,००० रुपये तिच्या मुलीच्या काळजीसाठी आहेत.












Click it and Unblock the Notifications