काव्या मारनला सापडला स्फोटक फलंदाज, जाणून घ्या कोण आहे अनिकेत वर्मा, लिलावात मिळाले फक्त एवढे पैसे
IPL 2025, Aniket Verma: आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध अनिकेत वर्माने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे. यानंतर त्याने दिल्लीविरुद्धही आपली ताकद सिद्ध केली. अनिकेतने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. हैदराबादकडून अनिकेत वर्माने 41 चेंडूत 74 धावांची खेळी केली. ज्यामुळे हैदराबादने 163 धावा पर्यंत मजल मारता आली.
कोण आहे अनिकेत वर्मा?
झाशीमध्ये जन्मलेल्या आणि मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या अनिकेत वर्माने सनरायझर्स हैदराबाद स्काउट्सचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने भोपाळ लिपर्ड्सकडून सहा सामन्यांमध्ये 273 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 41 चेंडूत 123 धावांचा समावेश होता. या डावात त्याने 13 षटकार मारले. यामुळेच हैदराबादने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि संघाचा हा निर्णय योग्य ठरला.

लहानपणीचं आईला गमावलं
लहानपणी आई गमावल्यानंतर त्याचे काका अमित वर्मा यांनी त्याला पाठिंबा दिला आणि क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन केले. रेल्वे युथ क्रिकेट क्लबमध्ये भोपाळमधील नंदजीत सर यांच्याकडे गेल्याने अनिकेतला त्याची अत्यंत गरज असलेली संधी मिळाली. प्रशिक्षक नंदजीत यांनी त्याला केवळ प्रशिक्षणच दिले नाही तर त्यांच्या घरी राहण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. ही एक अशी संधी होती जी अनिकेतसाठी वरदानापेक्षा कमी नव्हती. प्रशिक्षकांच्या पाठिंब्याने अनिकेतने क्रिकेटच्या जगात आपले नाव कमावण्यास सुरुवात केली.
आयपीएलमध्ये कशी मिळाली एंट्री
एमपी प्रीमियर लीगने अनिकेतला एक व्यासपीठ दिले. याठिकाणी त्याने कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जीवावर आपल्या गुणवत्ता सिध्द केली. एमपी प्रीमियर लीगच्या एका सामन्यात अनिकेतने फक्त 32 चेंडूत 13 षटकार मारून शतक झळकावले. हा पराक्रम त्याच्या क्रिकेट जगतातल्या ताकदीचा आणि क्षमतेचा परिचय करून देणारा होता. त्याच्या चमकदार कामगिरीने तो प्रसिद्धीच्या झोतात आला. स्पर्धेतील सहा सामन्यांमध्ये त्याने 195 च्या स्ट्राईक रेटने आणि 54.6 च्या सरासरीने 273 धावा करून सर्वाधिक धावा केल्या. अनिकेतने सर्वाधिक 25 षटकारही मारले होते.
या कामगिरीनंतर अनिकेतला अनेक फ्रँचायझींनी ट्रायलसाठी बोलावले. दरम्यान त्याला एसआरएच घेतलेल्या ट्रायलमुळे त्याला सर्वाधिक अपेक्षा होत्या. कारण त्याच्या मते त्या ट्रायल सर्वोत्तम होत्या. जेव्हा त्याला लिलावात एसआरएचने विकत घेतले तेव्हा त्याला त्याच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. हैदराबादने अनिकेतला लिलावात 30 लाख रुपयांना कायम ठेवले होते.












Click it and Unblock the Notifications