बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अनेकांना जमले नाही, ते त्याने करून दाखवले!
India vs West Indies, Jasprit Bumrah Creates History : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे टीम इंडियाने वर्चस्व गाजवले.
वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांत गुंडाळण्यात आला, यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बुमराहने घेतलेल्या तीन महत्त्वाच्या विकेट्समुळे त्याने एक असा मोठा विक्रम रचला आहे, जो यापूर्वी कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाला करता आलेला नाही. त्यामुळे त्याने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराह अव्वल!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हज आणि जोहान लिन या तीन फलंदाजांना बाद करून जसप्रीत बुमराहाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात भारतीय भूमीवर 50 विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. यापूर्वी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला ते जमले नाही.
हा पराक्रम करणारा बुमराह पहिला गोलंदाज ठरला!
भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचे वर्चस्व असते, अशा परिस्थितीत बुमराहने १३ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे, जी त्याची अष्टपैलुत्व आणि गुणवत्ता सिद्ध करते.
अश्विन-जडेजा यांच्या पंक्तीत स्थान
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात भारतीय भूमीवर ५० हून अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराहने आता स्थान मिळवले आहे. त्याच्या आधी दोन भारतीय फिरकीपटूंनी हा पराक्रम केला आहे:
- रविचंद्रन अश्विन: १४९ बळी
- रवींद्र जडेजा: ९४ बळी. मात्र, वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराह हा या यादीत अव्वल आहे.
एकदिवसीय कारकिर्द, सर्वोत्तम कामगिरी
जसप्रीत बुमराह २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने एकूण ४९ कसोटी सामन्यांमध्ये २२२ बळी घेतले आहेत, ज्यात त्याने १५ वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी (फाइव्ह-विकेट हॉल) घेण्याचा पराक्रम केला आहे.
या विक्रमादरम्यान (WTC मधील ५० विकेट्स) बुमराहची घरच्या मैदानावर एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ४५ धावांत ६ बळी अशी राहिली आहे.
त्याच्या अचूक यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेला बुमराह, त्याच्या लयीत असताना कोणत्याही फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगतो. यामुळेच त्याची गणना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते.












Click it and Unblock the Notifications