Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भौ, तू बुमराहला भिडतो काय.? बुमराह- नायरच्या भांडणात, रोहित शर्माची रिअँक्शन व्हायरल; हा व्हिडीओ पहा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2025) रविवारी दिल्ली विरुद्ध मुंबई सामना रंगला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज सामना खेळला गेला. याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज करुण नायर यांच्यात मैदानावरच भांडण झाल्याने वातावरण तापले. या दोघांमध्ये जोरदार वादविवाद झाला. हे भांडण थेट कर्णधार हार्दीक पांड्यापर्यंतही गेले. हे सगळं कर्णधार रोहित शर्माही पाहत होता. यावेळी त्याने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली.

Rohit Sharma viral video

नेमके काय झाले?

ही घटना दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या सहाव्या षटकात घडली. करुण नायरने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दोन षटकार आणि एक चौकार लगावला. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत २२ चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. नायर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो जसप्रीत बुमराहला धडकला. हे पाहून बुमराह त्याच्यावर रागावला.

वाद चांगलाच पेटला

धडकल्यानंतर बुमराह करुण नायरला काहीतरी बोलताना दिसला. करुण नायरनेही त्याची चूक मान्य केल्याचे हावभाव दिसले. मात्र बुमराह चांगलाच भडकलेला दिसला. तो शांतच झाला नाही. टाइम आउट दरम्यान, जसप्रीत नायरकडे गेला. त्याला पुन्हा काहीतरी बोलताना दिसला. यामुळे नायरही संतापला. या विषयावर त्यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याशी चर्चा केली. यानंतर रोहित शर्माही करुण नायरला चिडवताना दिसला.

रोहित शर्मा व्हायरल

एमआयचा कर्णधार हार्दिक पंड्याकडे वाद पोहोचला. तो हार्दीकला स्पष्टीकरण देऊ लागला. मग हार्दिकने त्याला शांत केले. यावेळी दिल्लीचे प्रशिक्षक हेमांग बदानी आणि गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल हे देखील मैदानावर उपस्थित होते. जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांच्यातील वादाच्या वेळी रोहित शर्मा बाजूला उभा राहिला. पण यावर त्याची प्रतिक्रिया खूपच मजेदार होती. यावेळी रोहित हसत आणि मजेदार पद्धतीने काहीतरी बोलताना दिसला. त्याच्या चाहत्यांना त्याची ही शैली खूप आवडत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+